मराठी नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. यंदा शालिवाहन शके १९४३ ला प्रारंभ झाला असून, यंदाचे संवत्सर प्लवनाम संवत्सर आहे. प्रत्येक मराठी महिन्यात दोन चतुर्थी येतात. महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थी विनायकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते, तर वद्य पक्षातील चतुर्थी संकष्ट किंवा संकष्टी चतुर्थी नावाने ओळखली जाते. दोन्ही चतुर्थींना गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाला अधिक महत्त्व आहे. मराठी व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. मराठी नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी म्हणजेच चैत्र संकष्ट चतुर्थी ३० एप्रिल २०२१ रोजी असून, या दिवशी कोणते शुभ योग जुळून येतायत, राज्यातील प्रमुख शहरांमधील चंद्रोदयाची वेळ कोणती? जाणून घेऊया... (Sankashti Chaturthi April 2021)
चैत्र महिन्यात चैत्रागौरीचे आवाहन केले जाते. तसेच चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थी शुक्रवारी येत आहे. शुक्रवार हा लक्ष्मी देवीला समर्पित असल्याची मान्यता असल्यामुळे या दिवशी गणपती बाप्पासोबत लक्ष्मी देवीची पूजा करणे शुभ व उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अथर्वशीर्षाचे २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा 'ॐ गं गणपतये नम:' या मंत्राचा १०८ वेळा जप करणे शुभलाभदायक ठरते, अशी मान्यता आहे.
'खेडी सुधारत नाहीत, तोवर भारत सुधारला असे म्हणता येणार नाही!' - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
चैत्र संकष्ट चतुर्थी: शुक्रवार, ३० एप्रिल २०२१ (Sankashti Chaturthi April 2021 Date)
संकष्ट चतुर्थी प्रारंभ: गुरुवार, २९ एप्रिल २०२१ रोजी रात्री १० वाजून १० मिनिटे.
संकष्ट चतुर्थी समाप्ती: शुक्रवार, ३० एप्रिल २०२१ रात्री ०७ वाजून १० मिनिटे.
चंद्रोदय वेळ: रात्री १० वाजून ४० मिनिटे.
सुखमय, समृद्ध जीवनासाठी गौतम बुद्धांच्या ‘या’ ५ गोष्टींचे आचरण आवश्यक
संकष्ट चतुर्थीला दोन अद्भूत शुभ योग
पंचांगानुसार, मराठी नवीन वर्षातील चैत्र संकष्ट चतुर्थीला शिव आणि परिघ नामक दोन योग जुळून येत आहेत. हे दोन्ही योग अत्यंत शुभ मानले जातात. ३० एप्रिल रोजी सकाळी ०८ वाजून ०३ मिनिटांपर्यंत परिघ योग असेल. यानंतर शिव योगाला प्रारंभ होईल. शत्रूंवर विजय प्राप्त करण्यासाठी परिघ योग शुभ मानला जातो. तर शिव योग शुभ फलदायक मानला जातो.
मर्यादेचे ‘लॉक’ आणि अपेक्षा ‘डाऊन’; सुखी, समृद्ध जीवनाचे सोपान
शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
मुंबई | रात्रौ १० वाजून ४० मिनिटे |
ठाणे | रात्रौ १० वाजून ४० मिनिटे |
पुणे | रात्रौ १० वाजून ३५ मिनिटे |
रत्नागिरी | रात्रौ १० वाजून ३४ मिनिटे |
कोल्हापूर | रात्रौ १० वाजून ३० मिनिटे |
सातारा | रात्रौ १० वाजून ३३ मिनिटे |
नाशिक | रात्रौ १० वाजून ३८ मिनिटे |
अहमदनगर | रात्रौ १० वाजून ३३ मिनिटे |
धुळे | रात्रौ १० वाजून ३७ मिनिटे |
जळगाव | रात्रौ १० वाजून ३३ मिनिट |
वर्धा | रात्रौ १० वाजून २० मिनिटे |
यवतमाळ | रात्रौ १० वाजून २१ मिनिटे |
बीड | रात्रौ १० वाजून २८ मिनिटे |
सांगली | रात्रौ १० वाजून २९ मिनिटे |
सावंतवाडी | रात्रौ १० वाजून ३० मिनिटे |
सोलापूर | रात्रौ १० वाजून २५ मिनिटे |
नागपूर | रात्रौ १० वाजून १९ मिनिटे |
अमरावती | रात्रौ १० वाजून २४ मिनिटे |
अकोला | रात्रौ १० वाजून २७ मिनिटे |
औरंगाबाद | रात्रौ १० वाजून ३२ मिनिटे |
भुसावळ | रात्रौ १० वाजता ३३ मिनिटे |
परभणी | रात्रौ १० वाजून २४ मिनिटे |
नांदेड | रात्रौ १० वाजून २१ मिनिटे |
उस्मानाबाद | रात्रौ १० वाजून २५ मिनिटे |
भंडारा | रात्रौ १० वाजून १७ मिनिटे |
चंद्रपूर | रात्रौ १० वाजून १६ मिनिटे |
बुलढाणा | रात्रौ १० वाजून ३० मिनिटे |
मालवण | रात्रौ १० वाजून ३१ मिनिटे |
पणजी | रात्रौ १० वाजून २९ मिनिटे |
बेळगाव | रात्रौ १० वाजून २७ मिनिटे |
इंदौर | रात्रौ १० वाजून ३६ मिनिटे |
ग्वाल्हेर | रात्रौ १० वाजून ३५ मिनिटे |