...तोपर्यंत अनुभवांचा काहीच उपयोग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 03:24 AM2020-06-24T03:24:05+5:302020-06-24T03:24:10+5:30

एकसमान वातावरणात उपलब्ध केलेल्या गोष्टी प्रत्येकजण सारख्याच प्रमाणात आत्मसात करतात असे नाही.

Self-transformation from experience | ...तोपर्यंत अनुभवांचा काहीच उपयोग नाही

...तोपर्यंत अनुभवांचा काहीच उपयोग नाही

googlenewsNext

सद्गुरू जग्गी वासुदेव
आयुष्यात कोणत्या प्रकारचे अनुभव आले याने काहीच फरक पडत नाही. ते अनुभव तुमच्यात कुठल्या प्रकारचे रूपांतरण घडवून आणतात हे फार महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुमच्यात स्व-परिवर्तन घडून येत नाही, तोपर्यंत अनुभवांचा काहीच उपयोग नाही. याचा अर्थ असा नाही की, आपला कायापालट करण्याच्या मागे आपण लागायचं. जर तुम्ही ते आत्मसात केलंत तर परिवर्तन होतंच, यात शंका नाही. प्रत्येकजण समान प्रकारच्या अन्नातून समान पोषण प्राप्त करतात असं नाही. हे वैद्यकीयदृष्ट्यासुद्धा सिद्ध केलं गेलंय. त्याचप्रमाणे, एकसमान वातावरणात उपलब्ध केलेल्या गोष्टी प्रत्येकजण सारख्याच प्रमाणात आत्मसात करतात असे नाही. उदाहरणार्थ, एकाच कुटुंबातील दोन मुले जरी एकसमान वातावरणात एकत्र वाढली असली तरी, दोघं एकमेकांपासून खूप भिन्नरीत्या मोठी होतात. जरी दोघांना सारख्याच गोष्टी दिल्या गेल्या असल्या तरी एक या दिशेला तर एक दुसऱ्या दिशेला. एक आध्यात्मिक प्रक्रिया, जर तिला जागृत करायचं असेल, तर त्यासाठी परित्यागापेक्षा फक्त शहाणपणाने जगणे गरजेचे आहे. कोणत्याही भारतीय भाषांमध्ये ‘परित्याग’ असा शब्द नव्हता. बाहेरून आलेल्या विद्वानांनीच असे म्हटले की, ‘या व्यक्तीने सर्वस्व त्यागले आहे.’ ते तसे नाही, त्याने संपूर्ण विश्वाला आपले मानले आहे; परंतु त्या विद्वानांना असे वाटले की, त्याने सर्वस्वी त्यागले आहे. ही त्यांची समज होती. कारण, काही ना काही गोष्ट आपल्या मालकीची आहे, असा शिक्कामोर्तब केल्याशिवाय ते आयुष्याची कल्पनाच करू शकत नव्हते. ‘या धरतीचा एक भाग माझा आहे.’ ज्याने संपूर्ण ब्रह्मांडालाच आपलंसं केलंय; त्याला आपण या गोष्टी आपल्याभोवती साठवून ठेवाव्यात, असा विचारच त्याच्या मनात उद्भवत नाही. तुम्हाला आंतरिक दृष्टिकोनाची गरज आहे म्हणून आयुष्यातील प्रत्येक अनुभवानिशी आपले आयुष्य समृद्ध करावे की त्याचा वापर जीवनाचा अधिकाधिक प्रतिरोध करण्यासाठी, याची निवड तुम्हीच करायला हवी.

Web Title: Self-transformation from experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.