अध्यात्ममार्गातील गूढ-गम्यता आणि साप यांना एकमेकांपासून वेगळं करता येण शक्य नाही. जगात जिथे कुठे आध्यात्मिक राहस्यांचा शोध घेतला गेला किंवा कोणी त्यांचा अनुभव घेतला - जसे मेसोपोटामिया, क्रेट, इजिप्ट, कंबोडिया, वियेतनाम आणि अर्थातच भारतातील प्राचीन संस्कृती – तिथे नेहमीच सापांचं अस्तित्व राहिलं आहे. जिथे साप नाही असं एकही मंदिर तुम्हाला भारतात सापडणार नाही. त्याचा एक पैलू असा आहे की सापाला नेहमीच एक प्रतीक रूप म्हणून मानलं गेलंय, कारण योगशास्त्रामध्ये वेटोळे मारून बसलेल्या सापाला कुंडलिनीचं प्रतीक मानलं गेलंय. पण या प्रतिकरूपाच मुख्य कारण हे आहे की ज्यांची जाणिवेची पातळी आणि क्षमता मनुष्या पेक्षा श्रेष्ठ आहे अश्या देव योनीतील (जसे यक्ष, गंधर्व) लोकांनी अस्तित्वाच्या आपल्या या आयामत प्रवेश करतांना नेहमी सापाचेच रूप धारण केले. पृथ्वीवरच्या प्रत्येक पौराणिक कथेत अशी अनेक उदाहरणं आपल्याला आढळतील. भारतात महादेव नाग-भूषण असण्याच्या कथेपासून अश्या प्रकारच्या इतर अनेक कथा आहेत.
आध्यात्मिक गूढ-गम्यता हा आकलनाचा (जाणून घेण्याच्या शक्तीचा) एक वेगळा आयाम आहे आणि साप ह्या आकलनशक्तिने उपजतच संपन्न आसतो. म्हणूनच महादेवाच्या कपाळावर तिसर्या डोळ्याच्या उघडण्याने दर्शविली जाणारी ही सर्वोच्य आकलनशक्ती नेहमीच सापांच्या उपस्थितीने अलंकारित करण्यात आली आहे. एक सरपटणारा प्राणी नेहमी जमिनीवरच रेंगाळतो पण शिवाने “एकप्रकारे हा प्राणी माझ्यापेक्षा सुद्धा उच्च स्तरावर आहे“ हे सूचित करण्यासाठी त्याला आपल्या डोक्यावर धारण केलं. कुठल्या ना कुठल्या मार्गाने प्रत्येक संस्कृतीने ही गोष्ट ओळखली आहे. सापांबद्दल आणि त्यांच्या आपल्या संस्कृतीमधल्या भूमिकेबद्दलच्या अनेक कथा आपल्या संस्कृती मध्ये आहेत.
पौराणिक कथांमध्ये पाताळात सर्पलोकाचा उल्लेख आहे – एक संपूर्ण समाज ज्यामधे फक्त सापच नाहीत तर सर्प-वंशातल्या मनुष्यांचा सुद्धा समावेश आहे. ते ‘नागा’ म्हणून ओळखले जातात आणि भारतीय संस्कृतीला आणि इतर बर्याच संस्कृतींना उभारण्यामद्धे आणि त्यांच्यामध्ये एक चैतन्य निर्माण करण्यामध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. ऐतिहासिकदृष्ट्या आपल्याला माहिती आहे की कंबोडिया मधील अंगकोर मधील महान मंदिरं या ‘नागा’ लोकांच्या वंशजांनीच बनवलीत. ‘नागा’ लोकांवर त्यांची राणी राज्य करत असे, राजा नाही; कारण त्यांची कुटुंबसंस्था मातृसत्ताक होती. नंतर, कौंडीण्य नावाच्या ब्राह्मण राजाने तिथे जाऊन नागांच्या राणीचा पराभव केला.
सापांशी खूप घनिष्ट नाते असणारे मनुष्य आजही आहेत. मी स्वत: त्यांच्यापैकीच एक आहे. मी ‘नागा’ नाही, पण माझं जीवन सापांपासुन वेगळं केलं जाऊ शकत नाही. माझ्या जीवनातल्या प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी साप आवर्जून उपस्थित असतात.
खर्या अर्थाने जमिनीला कान लावणारा
एखादी व्यक्ति जर खरोखर ध्यानस्थ झाली तर तिच्याकडे सर्वात आधी आकर्षित होणार प्राणी म्हणजे साप. म्हणूनच ऋषि-मुनि आणि सिद्धपुरुषांच्या चित्रांमद्धे त्यांच्या आजूबाजूला नेहमीच साप दिसून येतात. सापांकडे एक अशी आकलनशक्ती आहे जिच्याद्वारे त्यांना जीवनाच्या काही विशिष्ट आयामांची जाणीव असते ज्यांची मनुष्याला नेहमीच उत्कंठा आणि आकांक्षा राहिली आहे.
ध्यानलिंगाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी जेव्हा आम्ही विशुद्धी चक्राची प्रतिष्ठापना करत होतो त्यावेळी सुमारे ४०० च्या वर लोक तिथे होते; पण एक साप त्यांच्यामधून रस्ता काढून सारखा आमच्या जवळ येऊन बसायचा. कितीतरी वेळा आम्ही त्याला उचलून जंगलात नेऊन सोडलं पण अर्ध्याच तासात तो परत येऊन बसायचा. त्याला ती प्राणप्रतिष्ठेची प्रक्रिया सोडायची नव्हती.
या पृथ्वीवर झालेला कुठलाही मूलभूत बादल ज्यांच्या सगळ्यात आधी लक्षात येतो त्यात साप हा पहिला प्राणी आहे कारण त्याचं पूर्ण शरीर सतत जमिनीच्या संपर्कात असतं. त्याला कान नाहीत, तो ठार बहिरा आहे; म्हणून तो त्याचं संपूर्ण शरीरच कान म्हणून वापरतो. तो खर्या अर्थाने जमिनीला कान लावून ऐकतो. कॅलिफोर्निया मध्ये जर भूकंप होणार असेल तर वेलंगिरी पर्वतावरच्या सापांना भूकंपाच्या वेळेच्या ३० ते ४० दिवस आधीच ते कळलेलं असेल. या पृथ्वीच्या बाबतीतली त्यांची आकलन शक्ति इतकी प्रचंड तीव्र असते.डावा: २००० वर्ष जुन्या शिल्पात नाग रूपात दाखवलेली इजिप्शियन देवता आयसीसउजवा: लिंगा भैरवी मंदिराच्या प्रवेश द्वारावर कोरलेला नाग
जगातल्या अनेक भागांमधल्या – जसे मध्य-पूर्व, उत्तर अफ्रीका, मेसोपोटामिया, दक्षिण एशिया, और मध्य यूरोप – देवी नेहमीच सापांच्या सोबत दर्शविण्यात आली. लिंग भैरवी मंदिरात प्रत्येक पौर्णिमेला भक्तांना सर्प-सेवा करता येऊ शकते. तिथे दोन साप एकमेकांना आलिंगन देताना दर्शवलेले आहे. पण ते एकमेकांमध्ये गुंतून पडलेले नाहीत. आलिंगन एकमेकांप्रती आस्थापूर्ण सहभागातून व्यक्त होते, परंतु आपल्या अनिवार्य गरजाच गुंतून पडण्याचं कारण असतात. ते साप एका विशिष्ट आलिंगनात आणि नृत्याच्या मुद्रेत आहेत जेणेकरून ते भाव सर्वांच्या जीवनात आणता येऊ शकतील. महिन्यातून एकदा या सापांना मुंग्यांच्या वारुळाची माती इतर काही पदार्थांसोबत मिसळून बनवलेल्या मिश्रणाने भरतात. आपली आकलन शक्ति वाढवण्यासाठी सापांचा उपयोग करून घेण्याचा हा एक मार्ग आहे.