साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२५ फेब्रुवारी ते २ मार्च===============
नंबर १:
हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येत आहे. तुमच्यातील जिद्द, धाडस, काहीतरी करून दाखवण्याची वृत्ती, या सगळ्यांचा उपयोग या आठवड्यात होणार आहे. खूप दिवसांपासून पासून तुम्हाला हवं असलेलं काहीतरी मिळण्याची शक्यता आहे, किंवा त्याबाबतीत सकारात्मक घटना घडतील. इतरांकडून मान सन्मान आणि सहकार्य मिळेल. लोकांना तुमचा सहवास आवडेल.
या आठवड्यात तुम्हाला तुमचं मन आणि विचार उत्साहयुक्त ठेवण्याची गरज आहे. काहीही झालं तरी खचून जाऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. इतरांना सुद्धा प्रेरणा द्या. लढण्याची वृत्ती ठेवा पण कोणाशी विनाकारण भांडू नका. स्पर्धा जिंकण्यापेक्षा काम असं करा की तुम्ही इतरांचं मन जिंकाल. आत्मविश्वास, प्रसंगावधान आणि खेळाडू वृत्ती ठेवा. सगळयांना घेऊन पुढे चाला. चांगलं नेतृत्व करा.
नंबर २:
हा सप्ताह तुमच्यासाठी पेलायला अवघड असणार आहे. मार्ग पटकन सापडणार नाहीत, उत्तरं मिळणार नाहीत. संवाद नीट होणार नाहीत. गैरसमज निर्माण होतील. बरीच जबाबदारी अंगावर पडेल, त्यामुळे कदाचित मान वर करायला ही वेळ मिळणार नाही. पण चांगली गोष्ट अशी की तुम्हाला त्रास देणाऱ्या काही गोष्टी आता संपणार आहेत. एक कटू शेवट होऊन, त्यापुढे एक सक्षम सुरुवात होणार आहे.
या आठवड्यात तुम्ही तुमच्या विचारांना आळा घालण्याची गरज आहे. परिस्थतीशी झगडायला जाऊ नका. लोकांशी बोलताना नम्रपणे आणि कमीपणा घेऊन बोललात तर त्रास कमी होईल. आत्ता तुमचे वर्चस्व दाखवण्याची वेळ नाही. थोडे धडपडलात तरी खचून जाऊ नका. विश्रांती घ्या. मान, पाठ, कंबर आणि डोकं हे काही दुखेल असं मुद्दाम वागू नका. झोप पूर्ण घ्या, रात्रीचे वाद आणि चर्चा टाळा.
नंबर ३:
हा सप्ताह तुमच्यासाठी तडजोडी करण्याचा आहे. अपेक्षित यश मिळवणे कठीण आहे. हव्या असलेल्या गोष्टी पटकन मिळणार नाहीत, त्यासाठी बरेच कष्ट करावे लागतील. कसलीतरी कमतरता जाणवेल. लोकांवर अवलंबून राहावं लागेल. भौतिक सुख सोयी जितक्या हव्याशा वाटतील तितक्याच त्या दुरावत जाऊ शकतात. इतरांकडून हीन वागणूक मिळू शकते.
या आठवड्यात तुम्ही स्वतःला संयमित ठेवण्याची गरज आहे. गरजा कमी करा. सध्या मोठी गुंतवणूक किंवा महत्त्वाचे पैशाचे व्यवहार टाळा. तुमच्याकडे काय नाही यापेक्षा आहे त्यात तुम्ही तुमचं उत्तम कसं करू शकता याकडे लक्ष द्या. भौतिक विषयांमध्ये खूप अडकून राहू नका, त्यातून निराशा संभवते. त्यापेक्षा ध्यान, उपासना, परोपकार हे जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. गरिबांना मदत करा. आरोग्य सांभाळा.
सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणेश्रीस्वामी समर्थ.