'या' राशींची लवकरच होणार शनीच्या प्रकोपापासून सुटका; कोणत्या आहेत त्या राशी, वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 11:00 AM2021-09-25T11:00:00+5:302021-09-25T11:00:03+5:30
शनीचा क्रोध आयुष्यात अनेक संकट आणतो, म्हणून लोक शनीची दशा बदलण्याची वाट पाहतात. ऑक्टोबर महिन्यात शनीच्या स्थितीत लक्षणीय बदल होणार आहे.
शनी देवाचे नाव ऐकताच अनेकांचे पाय लटपटतात. त्यांचे आपल्या राशीला येणे अनेकांना भीतीदायक वाटते. परंतु शनी देव हे एखाद्या कडक शिस्तीच्या शिक्षकांसारखे असतात. ते आपल्याला धडा शिकवण्यासाठी नव्हे, तर आपल्याला शिस्त लावण्यासाठी आपल्या राशीला येतात. सध्या ते धनु, मकर आणि कुंभ राशीत मुक्कामी आहेत. त्यालाचापण साडेसाती म्हणतो. मात्र पुढील महिन्यापासून शनी देवाची वक्री चाल सरळ होणार आहे. या स्थित्यंतराचा लाभ ३ राशीच्या लोकांना होणार आई. साडेसाती जरी तीन राशींना असली तरी अन्य राशीवर त्याचा प्रभाव पडत असतो. शनी देवाच्या आगामी स्थित्यंतरामुळे पुढील तीन राशींना खूप आराम मिळेल व अनेक फायदेही होतील.
शनीचा क्रोध आयुष्यात अनेक संकट आणतो, म्हणून लोक शनीची दशा बदलण्याची वाट पाहतात. ऑक्टोबर महिन्यात शनीच्या स्थितीत लक्षणीय बदल होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनी, जो सध्या प्रतिगामी गतीमध्ये आहे, ११ ऑक्टोबरपासून सरळ सरकण्यास सुरुवात करेल. यामुळे शनीच्या प्रकोपाला सामोरे जाणाऱ्या राशींना खूप आराम मिळेल. जाणून घ्या की शनीची थेट हालचाल कोणत्या राशींच्या जीवनात आनंद आणेल.
या आहेत त्या तीन राशी :
तूळ: लवकरच तूळ राशीच्या लोकांच्या जीवनातील अनेक समस्या संपुष्टात येणार आहेत. करिअरमध्ये चांगले दिवस येतील. बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील. व्यवसायातही नफा होईल.
मिथुन: मिथुन राशीवरही शनीच्या स्थित्यंतराचा अनुकूल परिणाम दिसून येईल. यामुळे तणाव, मानसिक अस्वस्थतेने ग्रस्त असलेल्या या लोकांना आता शांती मिळेल. आर्थिक लाभही होतील.
धनु: धनु राशीच्या साडेसातीचा हा शेवटचा काळ असल्यामुळे आयुष्यात आलेले त्रास आता संपतील. थांबलेले काम होईल. मालमत्तेशी संबंधित लाभ होतील. घरात शुभकार्य घडेल. आनंदाचे दिवस सुरू होतील.