निस्वार्थ सेवा कशाला म्हणावे? जाणून घ्या स्वामी शांतिगिरीजी महाराजांकडून, आजच्या लोकमत भक्ती live सत्रात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 08:00 AM2021-01-07T08:00:00+5:302021-01-07T08:00:32+5:30

आपल्या हातून सत्कार्य घडावे, सेवा घडावी आणि चांगले कार्य केल्याचे समाधान मिळावे, असे वाटत असेल तर आपणही ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे विचार जरूर ऐका, लोकमत भक्ती या युट्यूब चॅनेलवर!

What is selfless service? Learn from Swami Shantigiriji Maharaj, in today's Lokmat Bhakti live session! | निस्वार्थ सेवा कशाला म्हणावे? जाणून घ्या स्वामी शांतिगिरीजी महाराजांकडून, आजच्या लोकमत भक्ती live सत्रात!

निस्वार्थ सेवा कशाला म्हणावे? जाणून घ्या स्वामी शांतिगिरीजी महाराजांकडून, आजच्या लोकमत भक्ती live सत्रात!

Next

दुसऱ्याच्या सुखाशी तुलना करणे हा मनुष्य स्वभाव आहे. परंतु, जोवर आपण दुसऱ्यांच्या दुःखाशी तुलना करत नाही, तोवर आपल्या वाट्याला आलेले दुःख किती कमी आहे, याची आपल्याला जाणीव होत नाही. ते जाणून घेण्याचा सोपा पर्याय आहे, तो म्हणजे निस्वार्थ सेवा. मात्र, ती एकाएक अंगी बाणता येत नाही. त्यासाठी हवा संयम आणि सराव. या दोन्ही गोष्टींचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वामी शांतिगिरीजी महाराज, ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. 

स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा मोठा शिष्यपरिवार आहे. ते जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी असंख्य व्यसनी जीवांना व्यसनमुक्त केले. संसारात भरकटलेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन केले. श्रमदानाच्या माध्यमातून लोकांना श्रमभक्ती शिकविली. सत्संगाच्या माध्यमातून अनेक पदभ्रष्ट झालेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन केले. 

स्वामी शांतिगिरीजी महाराज कृषी आणि ऋषी संस्कृतीचे पुरस्कर्ते आहेत. शेतकरी संकटात सापडला तर त्याच्यासाठी पर्जन्ययाग यज्ञ करणे आणि त्याच्या मदतीला धावून जाणे हे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मदत करून त्यांनी दाखवून दिले आहे.आज कोरोना संकटातून देशाला नव्हे तर विश्वाला मुक्ती मिळावी म्हणून दैनंदिन होम हवन, महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या मजुरांना भोजनाची व्यवस्था सुरू आहे. आज प्रत्येक आश्रमात दोन वेळचे मोफत भोजन अन्नदान सुरू आहे. आश्रमात येणाऱ्या प्रत्येक जीवाला शांती मिळावी म्हणून सतत प्रयत्नशील राहणे. असे अनेक समाजपयोगी कार्य स्वामी शांतिगिरीजी बाबा करत आहेत. त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या वेळेस हजारो साधू संतांना, संन्यासी महाराजांना भोजन देणे, वृक्षारोपण करणे, फळ फुलांच्या झाडांची देखभाल व संरक्षण करणे. असे अनेक उपक्रम स्वामी शांतिगिरीजी बाबा आश्रमाच्या वतीने करत असतात. 

स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या निष्काम कर्मयोगातून आपल्यालाही निश्चितच बोध घेता येईल. आपल्या हातून सत्कार्य घडावे, सेवा घडावी आणि चांगले कार्य केल्याचे समाधान मिळावे, असे वाटत असेल तर आपणही ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे विचार जरूर ऐका, लोकमत भक्ती या युट्यूब चॅनेलवर!

Web Title: What is selfless service? Learn from Swami Shantigiriji Maharaj, in today's Lokmat Bhakti live session!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.