साकोली : प्रशासकीय कामाकाजातील सर्वाेच्च स्थान असलेल्या मंत्रालयाला आग लागल्यानंतर सर्वच तालुकास्तरीय ग्रामपंचायतीला अग्निशामक वाहनाची सोय करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र या आश्वासनाला आठ महिन्यांचा कालावधी लोटला तरी असून तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीला अग्निशामक वाहन मिळालेले नाही. त्यामुळे साकोली तालुक्याला कुठेही आग लागल्यास भंडारा किंवा तुमसर येथून व्यवस्था करावी लागते.साकोली येथे सर्वच विभागाचे तालुकास्तरीय कार्यालय आहे. त्यामुळे अतिमहत्वाची दस्ताऐवज या कार्यालयात असतात. त्या दस्ताऐवजाची सुरक्षा करणे काळाची गरज ठरली आहे. यासाठी प्रत्येक कार्यालयात रात्रपाळीला चौकीदाराची सोय केली आहे. शासनाच्या माध्यमातून ही कागदपत्रे जोपासण्यासाठी सर्वाेतोपरी हालचाली होत असले तरी एखाद्यावेळी शासकीय कार्यालयाला आग लागल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाची येथे सोयच नाही. मागील उन्हाळ्यात साकोली येथील एलआयसी कार्यालयाला आग लागल्याने त्यातील महत्वाची दस्ताऐवज जळून खाक झाले होते. कारण तुमसर येथून अग्नीशामक दलाला येईपर्यंत बराच उशीर झाला होता.साकोली तालुक्यातून चुलबंद नदीसह बरेच लहान मोठे तलाव, नाले आहेत. पुरपरिस्थितीच्या वेळी अग्निशामन विभागाची महत्वाची भूमिका असते. परंतु ज्या विभागावर ही संपूर्ण सुरक्षा अवलंबून आहे. त्या विभागाकडेच शासनाचे दुर्लक्ष आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वास्तवच आहे. त्यामुळे गावाचा विस्तारही वाढला आहे. (तालुका प्रतिनिधी)
१.२८ लाख लोकांची अग्निसुरक्षा रामभरोसे
By admin | Published: December 22, 2014 10:42 PM