१३ व्यक्ती पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 05:00 AM2020-06-20T05:00:00+5:302020-06-20T05:01:17+5:30

जिल्ह्यात नागपूर येथून चार व्यक्ती, दिल्ली तीन, मुंबईत दोन आणि चंद्रपूर, छत्तीसगड, पुणे, कतार येथून प्रत्येकी एक असे १३ व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यांच्या घश्यातील स्वॅबचे नमूने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. शुक्रवारी त्या १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

13 persons positive | १३ व्यक्ती पॉझिटिव्ह

१३ व्यक्ती पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देबाधितांची संख्या ७१ : भंडारा, तुमसर, पवनी आणि लाखनी तालुक्याचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सुरूवातीला कोरोनामुक्त असलेल्या भंडारा जिल्ह्यात आता रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण येण्याची ही पहिलीच वेळ आहे. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेले सर्वच्या सर्व रुग्ण महानगरातून भंडारा जिल्ह्यात दाखल झालेले आहेत.
लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर भंडारा जिल्ह्यात सुरूवातीलच्या महिन्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नव्हता. मात्र भंडारा तालुक्यातील गराडा येथील एक महिला कोरोना बाधित आढळून आली. त्यामुळे तिथून भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. आता तर कोरोनाबाधितांची संख्या ७१ वर पोहचली आहे. सुदैवाने जिल्ह्यात एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नसून ४१ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या ३० कोरोनाबाधितांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
जिल्ह्यात नागपूर येथून चार व्यक्ती, दिल्ली तीन, मुंबईत दोन आणि चंद्रपूर, छत्तीसगड, पुणे, कतार येथून प्रत्येकी एक असे १३ व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यांच्या घश्यातील स्वॅबचे नमूने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. शुक्रवारी त्या १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
या रुग्णांमध्ये भंडारा तालुक्यातील तीन, पवनी सात, तुमसर दोन आणि लाखनी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. एकाच दिवशी १३ रुग्ण पॉझिटिव्ह निघण्याची जिल्ह्याची ही पहिलीची घटना असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत ३३०९ व्यक्तींच्या घश्यातील स्त्रावाचे नमूने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ७१ अहवाल पॉझिटिव्ह तर ३१३५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. १०३ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात २४ व्यक्ती शुक्रवारी दाखल असून आतापर्यंत ४१४ व्यक्तींना येथून सुटी देण्यात आली आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे ५३० व्यक्ती दाखल आहेत. तर २३३३ व्यक्तींना हॉस्पिटल क्वारंटाईमधून सुटी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाय योजना करीत आहेत.

महालगाव येथील प्रतिबंध हटविले
साकोली तालुक्यातील महालगाव येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने कंटेन्टमेंट झोन आणि बफर झोन जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केला होता. मात्र आता तेथील कोरोना बाधित रुग्ण पुर्णत: बरा झाला असून त्यामुळे येथील सर्व प्रतिबंध हटविण्यात आले आहेत. महालगाव कंटेन्टमेंट क्षेत्र आणि लगतचे सुकळी, सोनका, पळसगाव बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. आता जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी तेथील प्रतिबंध १९ जूनच्या रात्री ८ वाजतापासून तात्काळ प्रभावाने हटविले आहे.

Web Title: 13 persons positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.