बारा महिन्यांत १७ हजार, तर १२ दिवसांत १२ हजार रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:34 AM2021-04-13T04:34:12+5:302021-04-13T04:34:12+5:30
बाॅक्स साेमवारी १५९६ पाॅझिटिव्ह भंडारा जिल्ह्यात साेमवारी १५९६ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यात भंडारा तालुका ७०७, माेहाडी ११०, तुमसर ...
बाॅक्स
साेमवारी १५९६ पाॅझिटिव्ह
भंडारा जिल्ह्यात साेमवारी १५९६ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यात भंडारा तालुका ७०७, माेहाडी ११०, तुमसर २०६, पवनी २२४, लाखनी ११५, साकाेली ६५ आणि लाखांदूर तालुक्यात १६९ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार ८४७ रुग्णांची नाेंद झाली असून त्यापैकी १८ हजार ८०९ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात १० हजार ६०२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील टाॅप टेन जिल्ह्यांत भंडाराची नाेंद हाेत आहे.
बाॅक्स
भंडारा तालुक्यात सर्वाधिक मृत्यू
साेमवारी भंडारा जिल्ह्यात १६ जणांचा काेराेनाने मृत्यू झाला. त्यात सर्वाधिक ९ मृत्यू एकाट्या भंडारा तालुक्यातील आहेत. लाखनी तालुका १, पवनी २, तुमसर २, माेहाडी १ आणि लाखांदूर तालुक्यातील एका व्यक्तीचा काेराेनाने मृत्यू झाला. भंडारा तालुक्यात आतापर्यंत २१३ जणांचा काेराेनाने बळी गेला. माेहाडी ३७, तुमसर ६९, पवनी ४७, लाखनी २२, साकाेली २९, लाखांदूर १९ रुग्णांचा काेराेनाने मृत्यू झाला आहे.