लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राइट टू एज्युकेशन (आरटीई) अंतर्गत भंडारा जिल्ह्यात ९१ शाळांमधून ७६७ जागा लॉटरी पद्धतीने भरण्यात येणार आहे. यात जिल्हाभरातून २६०३ अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यापैकी डबल अर्ज सादर केलेल्या १८ जणांचे अर्ज डिलीट करण्यात आले आहे. २५ टक्के ऑनलाइन प्रवेशाकरिता आता लॉटरी पद्धतीने केव्हा यादी जाहीर होणार याकडेच पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. आवश्यक असलेल्या कागदपत्रांची चाचपणी करण्यात आली आहे.दरम्यान महिन्याभरापासून सुरू असलेल्या या प्रक्रियेला लॉटरीचा निकाल घोषीत झाल्यानंतर प्रवेशाला प्रारंभ होणार आहे. मोफत प्रवेश असला तरी पालकांना या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून अर्ज सादर करावे लागले आहे. आता २५८५ अर्जापैकी कुणाचा नंबर लागतो याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
डबल आलेले अर्ज बाद१० मार्चपर्यंत इच्छूक पालकांनी त्यांच्या पाल्याचे आरटीई अंतर्गत अर्ज दाखल केले आहे. जिल्ह्यातून आलेल्या २६०३ अर्जापैकी १८ अर्ज डिलीट करण्यात आले आहे. १८ जणांनी एकाच पाल्याचे दोनवेळा अर्ज भरल्यानंतर एक अर्ज स्टँन्ड ठेवला जात असतो. तसेच दुसरा अर्ज डिलीट केला जातो. सर्वात जास्त अर्ज भंडारा ९०४, लाखनी २६४, तुमसर ५५६, मोहाडी ३४६, पवनी २५०, साकोली २२१ तर लाखांदूर तालुक्यातून ६२ अर्ज आले होते.
लॉटरी केव्हा
- इंग्रजी शाळांच्या असलेल्या एकूण जागेपैकी २५ टक्के जागा आरटीई अंतर्गत भरण्यात येत असतात. यात जिल्ह्यात ९१ शाळा आहेत. - यात लवकरच लॉटरी पद्धतीने जागा भरण्यासंदर्भात घोषणा करण्यात येणार आहे. परिणामी लॉटरी केव्हा उघडणार याकडे लक्ष आहे.