गोसेखुर्द प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 05:00 AM2021-07-25T05:00:00+5:302021-07-25T05:00:52+5:30

गतवर्षी थोडा निष्काळजीपणा झाल्याने धरणातील पाणीसाठा बेसुमार वाढला व मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. परिणामी वैनगंगेला महापूराला. प्रशासनाची दमछाक झाली होती. घरांचे, शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. गतवर्षीचा पूर्वानुभव लक्षात घेऊन यावर्षी प्रशासन सतर्क झाले आहे. गोसीखुर्द प्रकल्पात शनिवारी सकाळी ७ वाजता २४३.१३० मीटर पाणीपातळी होती. त्यावेळी २३ दरवाजे अर्धा मीटरने उघडून २६७९.८२२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. 

19 doors of Gosekhurd project opened | गोसेखुर्द प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडले

गोसेखुर्द प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडले

Next
ठळक मुद्दे२२४९ क्यूमेक्स विसर्ग : नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

लाेकमत न्यूज नेटवर्क
पवनी : गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पातळी कायम राखण्यासाठी धरणाचे शुक्रवारी सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरम्यान शनिवारी यातील दहा दरवाजे बंद करण्यात आले असून सध्या १९ दरवाज्यातून २२४९ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग हाेत आहे. परंतु सायंकाळपर्यंत या धरणातून पाच हजार क्युमेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणाचे पाणलोट क्षेत्रासह मध्यप्रदेशात दमदार पाऊस सुरु आहे. गतवर्षी थोडा निष्काळजीपणा झाल्याने धरणातील पाणीसाठा बेसुमार वाढला व मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. परिणामी वैनगंगेला महापूराला. प्रशासनाची दमछाक झाली होती. घरांचे, शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. गतवर्षीचा पूर्वानुभव लक्षात घेऊन यावर्षी प्रशासन सतर्क झाले आहे. गोसीखुर्द प्रकल्पात शनिवारी सकाळी ७ वाजता २४३.१३० मीटर पाणीपातळी होती. त्यावेळी २३ दरवाजे अर्धा मीटरने उघडून २६७९.८२२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. 
दिवसभर पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने सायंकाळी ५ वाजता धरणाचे १९ दरवाजे उघडे हाेते. त्यातून २२४९ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु हाेता. वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहात आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.

धरणाची पाणी पातळी २४३.१०० मीटर
- पवनी तालुक्यातील गाेसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलाेट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढत आहे. प्रकल्पाची शनिवारी २४३.१०० मीटर पाणी पातळी हाेती. धरणातील पाण्याची पातळी राखण्यासाठी या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आगामी काही काळात पाण्याचा माेठ्या प्रमाणात विसर्ग हाेणार आहे.

 

Web Title: 19 doors of Gosekhurd project opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.