गाेसेखुर्द प्रकल्पाचे २१ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; २५१८ क्यूमेक्स विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 05:47 PM2021-09-11T17:47:58+5:302021-09-11T17:48:48+5:30

Bhandara News विदर्भातील महत्वाकांक्षी गाेसेखुर्द अर्थात इंदिरा सागर राष्ट्रीय प्रकल्पाचे शुक्रवारी २१ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे.

21 gates of Gaisekhurd project opened by half a meter; 2518 Qmax Visarga | गाेसेखुर्द प्रकल्पाचे २१ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; २५१८ क्यूमेक्स विसर्ग

गाेसेखुर्द प्रकल्पाचे २१ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; २५१८ क्यूमेक्स विसर्ग

Next
ठळक मुद्देजूनपासून दहावेळा उघडले दरवाजे

 

लोकमत न्यूज नेटवर्क

अशाेक पारधी
भंडारा : विदर्भातील महत्वाकांक्षी गाेसेखुर्द अर्थात इंदिरा सागर राष्ट्रीय प्रकल्पाचे शुक्रवारी २१ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. याप्रकल्पातून २५१८.३ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत दहावेळा या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असून ४३८४.६९१ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. (21 gates of Gaisekhurd project opened by half a meter)


पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गाेसेखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे एकूण सिंचन क्षेत्र २५ लाख ८०० हेक्टर आहे. जून महिन्यापासून या प्रकल्पात ४७२६.०८ दलघमी पाण्याचा येवा झाला आहे. पाणी पातळी २४४.१५० मीटर असल्याने व पावसाचे शक्यता असल्याने या प्रकल्पाचे २१ वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने वैनगंगा दुथडी भरुन वाहत आहे. नदीतिरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


गाेंदिया जिल्ह्यातील कालीसरार धरणाचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता आहे.  या जलाशयाचा एक दरवाजा शुक्रवारी सकाळी ०.३० मीटर उघडण्यात आला हाेता. कालीसरार धरण हे बाघ नदीवर असून धरणातील विसर्गाचे पाणी पुजारीटाेला प्रकल्पात जाते. पुजारीटाेला प्रकल्पतून पाणी साेडल्यानंतर भंडारा शहराजवळील कारधा पुलावर पाणाी येण्यास ३१ तासाचा कालावधी लागताे. त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून गाेसे प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. 

Web Title: 21 gates of Gaisekhurd project opened by half a meter; 2518 Qmax Visarga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.