भंडारा जिल्ह्यातील २२२ शेतकऱ्यांना मिळाला ‘सौरऊर्जेचा हात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 10:43 AM2017-12-14T10:43:41+5:302017-12-14T10:44:41+5:30

राज्य वीज वितरण कंपनीतर्फे राबविण्यात येत असलेल्या अटल सौर कृषीपंप योजनेंतर्गत २२२ शेतकऱ्यांच्या शेतात सौर उर्जेचा वापर करीत कृषीपंपांची मदत देण्यात आली आहे.

222 farmers of Bhandara district get 'solar energy' | भंडारा जिल्ह्यातील २२२ शेतकऱ्यांना मिळाला ‘सौरऊर्जेचा हात’

भंडारा जिल्ह्यातील २२२ शेतकऱ्यांना मिळाला ‘सौरऊर्जेचा हात’

Next
ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमानआज राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस

इंद्रपाल कटकवार।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : राज्य वीज वितरण कंपनीतर्फे राबविण्यात येत असलेल्या अटल सौर कृषीपंप योजनेंतर्गत २२२ शेतकऱ्यांच्या शेतात सौर उर्जेचा वापर करीत कृषीपंपांची मदत देण्यात आली आहे. राष्ट्रीय उर्जा दिवसाच्या निमित्ताने सौर उर्जेच्या वापराकडे नागरिकांचा कल वाढावा हाच शासनाचाही मुख्य उद्देश आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी तर्फे मागील वर्षी अटलसौर कृषीपंप योजनेंतर्गत १९५ कृषीपंप बसविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात १५५ नवीन कृषीपंप लावून देण्यात यावे असे वाढीव उद्दिष्टही देण्यात आले. यावर्षी सातही तालुक्यांतर्गत आॅनलाईन नोंदणी अंतर्गत ३१५ लाभार्थ्यांना मागणीपत्र देण्यात आले होते.
यापैकी २४७ लाभार्थ्यांनी मागणीपत्र भरल्यानंतर निधीचा भरणा केला होता. यापैकी २२२ शेतकरी लाभार्थ्यांना सौर कृषीपंपाची जोडणी देण्यात आली आहे. उर्वरीत २५ लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


पाच एकरापर्यंत मिळतो लाभ
या योजनेअंतर्गत अल्पभूधारक म्हणजेच पाच एकर पर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो. याशिवाय १० एकर शेती असलेल्या शेतकरीही कमी सबसिडीवर याचा लाभ घेऊ शकतात. यात ३ एचपी ते ७.५ हार्सपावर क्षमतेचे कृषीपंप संचासह लावून देण्यात येते. सद्यस्थितीत चार दिवसांपूर्वीच वीज वितरण कंपनीने या योजनेचे पोर्टल तात्पुरते बंद केले असून नवीन लाभार्थ्यांना याचा लाभ घेण्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Web Title: 222 farmers of Bhandara district get 'solar energy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती