शहरं
Join us  
Trending Stories
1
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
2
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
3
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
4
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
5
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
6
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
7
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
8
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
9
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, NSE नं केला मोठा बदल
11
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
12
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
13
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
14
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
15
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास
16
शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!
17
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
18
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
19
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
20
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...

रोजगारातून 28 हजार महिला झाल्या सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 5:00 AM

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिला बचत गटासारख्या चळवळीच्या माध्यमातून समाजात सन्मानाने जगण्याचा मार्गदेखील महिलांनी स्वीकारलेला पाहायला मिळत आहे. मोहाडी तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानांतर्गत १,७११ महिला बचत गट कार्यरत आहेत. यात १८ हजार ५२२ महिला स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमामधून अनेक महिलांचे संसार उभे राहिले आहेत.

ठळक मुद्देआज जागतिक महिला दिन : जिल्ह्यातील बचत गटांची भरारी, अन्‌ गवसला प्रगतीचा मार्ग

राजू बांतेलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : एकजूट, जिद्द, मेहनत याद्वारे या महिलांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्या आता ख-या अर्थाने सक्षम झाल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळत आहे. मेहनतीच्या जोरावर प्रगतीचा मार्ग गवसला आहे.एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला महिलांचा सहभाग सर्वच क्षेत्रांत दिसू लागला आहे. मर्यादित क्षेत्रापुरते स्वत:ला मर्यादित न ठेवता महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिला बचत गटासारख्या चळवळीच्या माध्यमातून समाजात सन्मानाने जगण्याचा मार्गदेखील महिलांनी स्वीकारलेला पाहायला मिळत आहे. मोहाडी तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानांतर्गत १,७११ महिला बचत गट कार्यरत आहेत. यात १८ हजार ५२२ महिला स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमामधून अनेक महिलांचे संसार उभे राहिले आहेत. त्या महिला आपल्या संसारासाठी हातभार लावत आहेत. २०२०-२०२१ मध्ये सात लक्ष ३१ हजार रक्कम ५७९ महिला बचतसमूहाला कर्जवाटप करण्यात आली आहे. तसेच ९४८ महिला बचत गटसमूहाला १०-१५ हजार खेळते भांडवल प्राप्त करून देण्यात आले आहे. या खेळत्या भांडवलावर आंधळगाव येथे वारली पेंटिंग, करडी येथे बांबू व्यवसाय, वरठी कागदी बाहुल्या, पाचगाव येथे जैविक खत, जैविक गांडूळ, कांद्री येथे बॅग व्यवसाय तसेच दुग्ध व्यवसाय, अगरबत्ती, पापड, मसाले आदी व्यवसाय मोहाडी तालुक्यात महिला बचत गटांमार्फत केले जात आहेत. महिलांनी आपले व्यवसाय घरबसल्या सुरू केले आहेत. या सर्व महिलांचे व्यवसाय आता स्थिर झाले आहेत. आंधळगाव येथे तर रेशीम कापडाच्या साड्या करण्याचा व्यवसाय दुर्गा व यशस्वी बचत गटांकडून केला जातो. 

आर्थिक व सामाजिक स्तर सुधारला n  बचत गटाने तयार केलेल्या साड्यांना राज्यात व परराज्यांत मागणी आहे. कुरिअरद्वारे आंधळगाव येथील साड्या विविध ठिकाणी पाठविल्या जातात. राज्यात होणाऱ्या महिला बचत गटांच्या प्रदर्शनांत आंधळगाव येथील साड्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. बचत गटांमुळेच या महिला एकत्र येऊन सुसंवाद साधू लागल्या. परस्परांमध्ये विचारविनिमय करू लागल्या आहेत. त्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर सुधारला, याची जाणीव त्यांना आहे. 

बचत गटांमुळे आर्थिक कणा सक्षम झाला आहे. प्रगतीच्या दिशेने झेपावणारा आत्मविश्वास वाढलेला आहे. याकरिता गरज आहे, ती जिद्द व संघर्ष करण्याची, संधीचं सोनं करण्याची.-कांचन निंबार्ते,  उपसरपंच, ग्रामपंचायत कान्हळगाव

 

टॅग्स :Womenमहिला