गुरुवारी १,५७९ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यात भंडारा तालुक्यात ३१, पवनी ४, मोहाडी आणि लाखनी येथील प्रत्येकी २ तर तुमसर आणि साकोली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३७ हजार २०५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १३ हजार ८१२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यापैकी १३ हजार १८५ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाला नाही. सध्या मृतांची संख्या ३२७ आहे.
बॉक्स
जिल्ह्यात ज्येष्ठांचे लसीकरण
कोविड-१९ लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १ मार्चपासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना आणि ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील अतिजोखमीच्या आजारी व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात १३ ठिकाणी लसीकरण करण्यात येत असून, त्यात भंडारा येथील जिल्हा रुग्णालय, टीबी रुग्णालय, गणेशपूर व परसोडी येथील आरोग्यवर्धीनी केंद्र, तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालय, खापा येथील आरोग्यवर्धीनी केंद्र, गोबरवाही व नाकाडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, पवनी येथे ग्रामीण रुग्णालय आणि कोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, साकोली येथे उपजिल्हा रुग्णालय, लाखांदूर, मोहाडी आणि लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात नि:शुल्क लसीकरण करण्यात येत आहे. तसेच महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत भंडारा येथील पेस हॉस्पिटल, इंद्राक्षी हाॅस्पिटल आणि साकोली येथील पार्वती हॉस्पिटलमध्ये लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी स्वयंनोंदणी संकेतस्थळावर करणे आवश्यक आहे.