जिल्ह्यात ५४ टक्के जलसाठा शिल्लक

By admin | Published: September 9, 2015 12:43 AM2015-09-09T00:43:00+5:302015-09-09T00:43:00+5:30

वरूणराजाच्या अवकृपेमुळे जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पावसाअभावी पिके करपू लागली असतानाच तीव्र उकाड्यामुळे नागरिकांचे जगणे असह्य होत आहे.

54 percent water stock in the district | जिल्ह्यात ५४ टक्के जलसाठा शिल्लक

जिल्ह्यात ५४ टक्के जलसाठा शिल्लक

Next

भंडारा : वरूणराजाच्या अवकृपेमुळे जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पावसाअभावी पिके करपू लागली असतानाच तीव्र उकाड्यामुळे नागरिकांचे जगणे असह्य होत आहे. जिल्ह्यातील ४ मध्यम आणि ३१ लघु प्रकल्पांपैकी ५0 टक्के प्रकल्प कोरडे पडले आहेत. तर २८ जुने मालगुजारी तलावात ७३.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा संपण्याच्या स्थितीत असून जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात फक्त ५३.६९ टक्केच जलसाठा आहे. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे. शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ ५३.६९ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी ७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात ६0.१५ टक्के जलसाठा होता. मात्र, पाऊस कमी पडल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जलसाठ?ात ६.४६ टक्क्यांनी घट झाली आहे. लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे.
सद्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ४0.७२, बघेडा ५७.६९ टक्के जलसाठा आहे. बेटेकर ४0.६४ टक्के व सोरना जलाशयात फक्त २२.२८ टक्केच पाणी असून चारही मध्यम प्रकल्पात ४0.0४ टक्के जलसाठा आहे.
मागील वर्षी चार मध्यम प्रकल्पात ७ सप्टेंबरपर्यंत ५६.३७ टक्के जलसाठा शिल्लक होता.
जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. सद्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ५४.९८ टक्के आहे. माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ७३.९७ टक्के आहे.
३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली, मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कातुर्ली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. गोसेखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा असला तरी शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे.
अनेक भागात नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळा संपण्याचा स्थितीत असतानाही जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ ६५.३५७ ददशलक्ष घनमीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे. गतवर्षी दि. ७ सप्टेंबरला ६३ प्रकल्पात ७३.२२९ दशलक्ष घनमीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता. त्याची टक्केवारी ६0.१५ एवढी होती. जिल्ह्यातील २८ मालगुजारी तलावात २५.३८0 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा साठवून ठेवता येते. यावर्षी या तलावात १८.७७३ दशलक्ष घनमीटर जलसाठा असून ७३ टक्के पाणी तलावात शिल्लक आहे.
मात्र, संपूर्ण ६३ प्रकल्पात १२१.७३९ दशलक्ष घनमीटर जलसाठा असल्याची क्षमता असतांना केवळ ६५.३५७ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी च्या तुलनेत यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यात प्रकल्पात अल्प प्रमाणात पाणी असल्याने जनावरांसह वन्य प्राण्यांसाठी धोक्याची घंटा ठरणारी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 54 percent water stock in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.