जिल्ह्यात आरटीईच्या ७२ टक्के जागा भरल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:08 AM2021-07-13T04:08:38+5:302021-07-13T04:08:38+5:30
भंडारा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीईमध्ये खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश देण्यात येत असतो. यात भंडारा ...
भंडारा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीईमध्ये खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश देण्यात येत असतो.
यात भंडारा जिल्ह्यातील ९४ शाळांमधून ७२.०७ टक्के जागा भरल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे प्रवेशासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतवाढीनंतरही अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही.
भंडारा जिल्ह्यात आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ९४ शाळांचा समावेश आहे. यातून ७८४ विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अपेक्षित आहे.
परंतु विद्यार्थी प्रवेश सुरू झाल्यापासून ७८४ पैकी ५६५ विद्यार्थ्यांनी
यादीनुसार संबंधित शाळेत प्रवेश घेतला आहे. उर्वरित २१९ जागा अजूनही भरलेल्या नाहीत. यात शिल्लक असलेल्या जागांमध्ये भंडारा तालुक्यातील ९०, लाखांदूर १, लाखनी २१, मोहाडी २२, पवनी १५, साकोली २५ तर
तुमसर तालुक्यातील ४५ जागांचा समावेश आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचण तर काही ठिकाणी पालकांची समस्या कारणीभूत ठरत आहे.
बॉक्स
दुसरी वेळ मुदतवाढ
आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पालकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले. यात अर्जाच्या छाननीनंतर यादी जाहीर करण्यात आली. प्रथम फेरीत पालकांनी पाल्यांचा प्रवेशही करून घेतला. परंतु दिलेल्या अवधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने शासनाने २३ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यादीप्रमाणे २१९ जागा भरायच्या आहेत.
बॉक्स
शाळांचे पैसे सरकार कधी देणार?
आरटीई प्रवेशाची गत वर्षीची रक्कम शाळांना अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे अनेक शाळा प्रशासन प्रवेश प्रक्रियेसदंर्भात उदासीनही दिसून येतात. पण नियमासमोर सर्वच हतबल आहेत. एकीकडे शासनाने दिलेल्या योजनांची अंमलबजावणी करावी तर दुसरीकडे निधी द्यायचा नाही. हा शासनाचा दुटप्पीपणा नव्हे का, असा प्रश्नही शाळा व्यवस्थापनासमोर उभा
ठाकला आहे.
बॉक्स
पालकांच्या अडचणी काय?
अर्ज सादर केल्यानंतर नंबर लागला. प्रवेशाबाबत निर्णयही घेतला. कोरोनाच्या धास्तीने वाट बघितली. आता त्वरित पाल्याचा प्रवेश करून घेणार आहे.
- एक पालक