अन् विमान प्रवासाने भारावला ‘ओम’

By admin | Published: June 23, 2017 12:21 AM2017-06-23T00:21:53+5:302017-06-23T00:21:53+5:30

सर्वांचाच पहिलाच विमानप्रवास होता. त्यामुळे विद्यार्थ्यांसारखी माझीही विमानात बसण्याची उत्सुकता वाढली होती.

Aam Aadmi says, 'Oh' | अन् विमान प्रवासाने भारावला ‘ओम’

अन् विमान प्रवासाने भारावला ‘ओम’

Next

लोकमत संस्कारांचे मोती स्पर्धा : दिल्लीत राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींची घेतली भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : सर्वांचाच पहिलाच विमानप्रवास होता. त्यामुळे विद्यार्थ्यांसारखी माझीही विमानात बसण्याची उत्सुकता वाढली होती. आम्ही नागपूर विमानतळावर पोहोचलो. अवघ्या दीड तासात दिल्लीला पोहोचलो. दिल्लीत भव्यदिव्य विमानतळ पाहून अक्षरश: भारावलो, हे सर्व ‘लोकमत’मुळे शक्य झाल्याची प्रतिक्रिया ओम बैस या विद्यार्थ्याने दिली.
लोकमत समूहातर्फे ‘संस्काराचे मोती’ या स्पर्धेतील विजेत्या चिमुकल्यांना नागपूर-दिल्ली-नागपूर अशी हवाई सफर करविण्यात आली. यात सहभागी होऊन परतल्यानंतर ओम बैस या विद्यार्थ्याने प्रवासाचे वर्णन कथन केले. बुधवारला तो परत आल्यानंतर त्याचा साकोली येथील कृष्णमुरारी कटकवार विद्यालयात लोकमत जिल्हा कार्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसार अधिकारी विजय बन्सोड, साकोली येथील तालुका प्रतिनिधी संजय साठवणे, प्राचार्य विजय देवगिरकर, क्रीडा शिक्षक शाहैद कुरैशी व शिक्षकवृंद उपस्थित होते.
नागपूर विभागातील संस्काराचे मोती या स्पर्धेतील विजेते बुधवारी सकाळी ७ वाजता नागपूर विमानतळावरून दिल्लीला विमान प्रवासाला निघाले. सर्वांचाच हा पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. प्रथम हवाई प्रवास असतानासुध्दा उत्साहामुळे कोणाच्याही मनात भीती जाणवत नव्हती. दीड तासाच्या हवाई प्रवासानंतर दिल्ली विमानतळावर आम्ही पोहोचलो. आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्यदिव्य रूप पाहून सर्वच विद्यार्थी भारावून गेले. त्यानंतर काही वेळातच गोवा व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची एकत्र भेट झाली. येथे दोन्ही राज्यातील विद्यार्थी एकत्र आले. त्यानंतर देशाची राजधानी असलेल्या दिल्ली भेटीच्या प्रवासाला सुरूवात झाली. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी भारतीय रेल्वेच्या म्युझियमला भेट दिली. तेथे त्यांना भारतीय रेल्वेच्या प्रारंभापासून वर्तमानापर्यंत रेल्वेने केलेल्या प्रगतीची माहिती मिळाली. त्याचबरोबर मेट्रो प्रकल्पाचीही माहिती देण्यात आली. इंडिया गेट, राष्ट्रपती भवनाला भेट दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधी स्मृती भवनाला भेट दिली. याप्रसंगाने सर्व विद्यार्थी भारावून गेले. प्रवासात महामहिम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
शालेय जीवनात कोणत्याही उपक्रमातून हवाई सफर घडविण्याची संधी उपलब्ध झालेली नाही. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला ‘लोकमत’ समूहाने ही संधी उपलब्ध करून दिली, असे सांगत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ही सर्व अनुभूती आपल्याला स्वप्नवत वाटत होती, अशी प्रतिक्रिया ओम बैस या विद्यार्थ्याने दिली. परतीच्या प्रवासाला सुरूवात झाल्यानंतर दीड तासात विमान नागपूरच्या आकाशात घिरट्या घालू लागले. नागपूरच्या दिशेने उड्डाण करीत पोहोचले, असे ओमने सांगितले. लोकमत समूहातर्फे ओमला मिळालेल्या दिल्ली हवाई सफरीमुळे शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थीत्र व कुटुंबामध्ये आनंद व्यक्त होत आहे लोकमतच्या उपक्रमामुळे त्याला अभूतपूर्व प्रवास करण्याची संधी मिळाली, असे उदगार ओमच्या कुटुंबीयांनी काढले.

Web Title: Aam Aadmi says, 'Oh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.