बंद युनिव्हर्सल कारखाना विक्रीच्या हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:38 AM2021-08-27T04:38:29+5:302021-08-27T04:38:29+5:30
तुमसर: मॅगनिज शुद्धीकरण करणारा तालुक्यातील माडगी येथील बंद असलेल्या युनिव्हर्सल कारखाना विक्रीला वेग आला असून आंध्र प्रदेशातील उद्योगपतींनी बुधवारी ...
तुमसर: मॅगनिज शुद्धीकरण करणारा तालुक्यातील माडगी येथील बंद असलेल्या युनिव्हर्सल कारखाना विक्रीला वेग आला असून आंध्र प्रदेशातील उद्योगपतींनी बुधवारी कारखान्याची पाहणी केली. यापूर्वी जिंदल समूहाने हा कारखाना खरेदीची तयारी दर्शविली होती. कारखाना विक्रीसाठी कारखानदार व खरेदीदार यांच्यातील बोलणी नंतरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
माडगी येथील युनिव्हर्सल फेरो कारखाना मागील १५ वर्षांपासून बंद आहे. या कारखान्यात सुमारे १२०० कामगार कामावर होते. परंतु कारखाना बंद केल्यामुळे ते बेरोजगार झाले. कारखानदाराने हा कारखाना सुरूच केला नाही. या कारखान्यावर नंतर दोनशे कोटी रुपयांचे वीज बिल थकीत होते. त्यापैकी दीडशे कोटी रुपये वीजबिल माफ करण्यात आले. ५० कोटी रुपये वीज बिल थकित होते. त्यामुळे या कारखान्याची वीज खंडित करण्यात आली होती. कारखानदाराने कारखाना बंद केला. काही अटी-शर्ती वर हा कारखाना कारखानदाराने पुन्हा सुरू केला होता. परंतु मागील पंधरा वर्षांपासून हा कारखाना कायम बंद आहे. परंतु कारखाना सुरू झाला नाही. काही कामगारांचे प्रकरण येथे न्यायप्रविष्ट आहे.
कारखानदाराने हा कारखाना विक्री करण्याकरिता हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील वर्षी जिंदल समूहाने कारखाना ४९७ कोटी रुपयांना मागितल्याची माहिती आहे. परंतु जिंदल समूहाशी बोलणी अंतिम टप्प्यात गेली नाही. पुन्हा हा कारखाना विक्रीकरिता हालचालींना वेग आला आहे. बुधवारी कारखान्याचे पाहणी करण्याकरिता आंध्र प्रदेश येथील एक उद्योग उद्योगपती व त्यांचे सहकारी येथे आले होते. त्यामुळे कारखाना विक्रीच्या चर्चेला उधाण आले आहे.
बॉक्स
कारखान्याचा परिसर ४०० एकरात
युनिव्हर्सल फेरो कारखाना सुमारे ४०० एकरात असून मॅगनिज शुद्धीकरण करणारे दोन युनिट येथे आहेत. याशिवाय इमारती आहेत. कारखाना विक्रीसाठी राज्य शासन, कारखानदार व खरीदार यांच्यातील बोलल्यानंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. हा कारखाना पुन्हा सुरू झाला तर स्थानिक बेरोजगारांना येथे हाताला काम मिळेल, अशी अपेक्षा येथील तरुणांना आहे.