भंडारा येथे भूमिगत गटार योजनेला प्रशासकीय मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 09:40 PM2021-09-22T21:40:09+5:302021-09-22T21:44:38+5:30

भंडारा शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक अशा भूमिगत गटार योजनेला शासनाने काही दिवसांपूर्वी तांत्रिक मान्यता प्रदान केली होती. १६७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्यात आला होता. दरम्यान, १६७ पैकी ११६ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याला शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

Administrative approval for underground sewerage scheme at Bhandara | भंडारा येथे भूमिगत गटार योजनेला प्रशासकीय मान्यता

भंडारा येथे भूमिगत गटार योजनेला प्रशासकीय मान्यता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरासाठी अत्यंत उपयुक्त आणि शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या भूमिगत गटार योजनेच्या १६७ कोटींपैकी ११६ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याला शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे आता भूमिगत गटार योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शहरातील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यास मदत होणार असून, सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.
भंडारा शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक अशा भूमिगत गटार योजनेला शासनाने काही दिवसांपूर्वी तांत्रिक मान्यता प्रदान केली होती. १६७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्यात आला होता. दरम्यान, १६७ पैकी ११६ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याला शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. शासकीय मान्यता मिळाल्यामुळे आता निविदाप्रक्रिया होऊन प्रत्यक्ष लवकरच कामाला सुरुवात होण्याची आशा निर्माण झाली आहे.
शासननिर्णयानुसार १० जुलै २०१७ च्या सर्वसाधारण सभेत या प्रकल्पासाठी भंडारा नगर परिषदेच्या १४ व्या वित्त आयोगातून १८ कोटी रकमेचा, लोकवर्गणीचा १५ टक्के सहभाग मागविण्याबाबतचा ठराव नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते मंजूर केला होता. या कामाला सर्व नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली होती. त्यामुळेच ही योजना आकारास येत असल्याचे नगराध्यक्ष मेंढे यांनी सांगितले.

नगरपरिषदेची महत्त्वाकांक्षी योजना 
- नगराध्यक्षांची निवडणूक लढविताना भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांनी या योजनेचा  समावेश घोषणापत्रात केला होता. नगराध्यपदी विराजमान झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम पाणीपुरवठा आणि भूमिगत गटार योजना मंजुरीसाठी प्रयत्न केले. मलनिस्सारण केंद्राच्या  जागेसाठी वारंवार गोसेखुर्द प्रकल्पाशी पाठपुरावा करून  दोन ठिकाणच्या जागा लीजवर मिळविण्यात नगराध्यक्षांची भूमिका महत्त्वाची होती. नवीन पाणीपुरवठा योजना आणि भूमिगत गटार योजना हे दोन्ही प्रकल्प नगराध्यक्षांचे महत्त्वाकांक्षी आहेत. त्यानुसार पाणीपुरवठा योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.  दरम्यान, भूमिगत गटार योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. जुलै महिन्यात १६७ कोटींच्या प्रकल्पाला तांत्रिक मान्यता मिळाली होती. पाणीपुरवठा योजनेचे ५० टक्के काम पूर्ण झाले असल्याने भुयारी गटार योजनेच्या पहिला टप्प्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 

भूमिगत गटार योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली असून  माझ्यासह सहकारी नगरसेवक यांचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. यामुळे आता लवकरच भंडारा शहरात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू झाल्याचे पहायला मिळेल. या योजनेमुळे भंडारा शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
-सुनील मेंढे, नगराध्यक्ष तथा खासदार

 

Web Title: Administrative approval for underground sewerage scheme at Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.