कृषीपूरक व्यवसाय मधुमक्षिका पालनातून आर्थिक विकास साधावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:37 AM2021-05-21T04:37:42+5:302021-05-21T04:37:42+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, साकोली आणि कृषी विभाग भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक ...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, साकोली आणि कृषी विभाग भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक मधुमक्षिका दिवस’ निमित्त आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.
कृषी विज्ञान केंद्र, साकोली आणि कृषी विभाग, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक मधुमक्षिका दिवस’ निमित्त आयोजित मधुमक्षिका पालन शेतकरी प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र, साकोली इथे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेला होता. ‘जागतिक मधुमक्षिका दिवस’ निमित्त आयोजित मधुमक्षिका पालन शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र, साकोली डॉ. एन. एस. वझिरे, जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ प्रदीप काठोळे, प्रमुख मार्गदर्शक सायन्स कॉलेज पवनीचे प्राध्यापक बी. एन. रहिले, शास्त्रज्ञ कृषी विस्तार प्रमोद पर्वते, शास्त्रज्ञ कृषी अभियांत्रिकी वाय. आर. महल्ले, शास्त्रज्ञ उद्यानविद्या सूचित लाकडे, लयंत अनित्य, सुनील साबळे, कपिल गायकवाड यांचेसह उमेद साकोली अंतर्गत कृषी सखी आणि जिल्ह्यातील ७५ शेतकरी उपस्थित होते.
सदर ‘मधुमक्षिका पालन शेतकरी प्रशिक्षण’ कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, साकोली कार्यक्रम समन्वयक डॉ. एन. एस. वझिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थितांना मधमाशी पालनाचा इतिहास व जागतिक मधमाशी दिनाचे महत्त्व व उद्देश सांगितले. मधमाशीला सामाजिक कीटक म्हणून संबोधले जाते. मधमाशी परागकण गोळा करून मध तयार करतात व परागीकरण करून पिकाच्या उत्पादनात १५ ते ३० टक्के वाढ करतात व देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भर घालतात. पीक उत्पादन वाढीसाठी तसेच निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी मधमाशांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रमुख मार्गदर्शक प्रा. बी. एन. रहिले यांनी उपस्थितांना सादरीकरणाच्या माध्यमातून मधमाशी पालनाबाबत माहिती दिली. यामध्ये त्यांनी ओळख, प्रजाती, संगोपन, काळजी, निगा, मधप्रक्रिया, मार्केटिंग आणि इतर बाबतीत माहिती दिली. तसेच ज्या दिवशी मधमाशांचे अस्तित्व संपणार त्यावेळी मानवजात अस्तित्व सुद्धा संपणार याकरिता जाणीव आणि जागृती आवश्यक आहे असे सांगितले.
संचालन प्रमोद पर्वते तर आभार प्रदर्शन योगेश महल्ले यांनी केले. कार्यक्रमाकरिता लयंत अनित्य, सुनील साबळे, कपिल गायकवाड यांनी प्रयत्न केले.