अख्खा डांबरी रस्ता मातीमोल

By admin | Published: February 18, 2017 12:20 AM2017-02-18T00:20:56+5:302017-02-18T00:20:56+5:30

शिर्षक वाचून नवल वाटावे असे काहीच नाही. ग्रामीण भागाचे रस्ते खड्ड्यांचे किंबहूना मृत्यू मार्ग अधिक आहेत.

Akhma Damar road Matiimol | अख्खा डांबरी रस्ता मातीमोल

अख्खा डांबरी रस्ता मातीमोल

Next

लोकप्रतिनिधी गप्प : खड्ड्याचे रस्ते, वाहनधारकांना त्रास
मोहाडी : शिर्षक वाचून नवल वाटावे असे काहीच नाही. ग्रामीण भागाचे रस्ते खड्ड्यांचे किंबहूना मृत्यू मार्ग अधिक आहेत. बोथली-पांजरा ते दाभा हा डांबरी रस्ता तर मातीत एकजीव झाला आहे. ‘अच्छे दिन’ आणणारे नेते गप्प कसे? ग्रामीण भागातील रस्त्यांना कधी ‘अच्छे दिन’ येतील याची प्रतीक्षा जनता करीत आहे.
ज्या वाहनधानकांनी दाभा- पांजरा ते बोथली मार्गाने प्रवास केला त्यांना वरील शिर्षकाचा वास्तविक अनुभव आला असेल. पांजरा ते दाभा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यामुळे त्या रस्त्याने वाहतूक वाढली होती. पेट्रोल, डिझेल इंधनची बचत करण्यासाठी दोन व चारचाकी वाहने या रस्त्याने धावू लागली होती. पांजरा रस्ता भंडाराकडे जाण्यासाठी कमी अंतराचा पडतो. प्रवाशांसाठी तो रस्ता सुलभ आहे. पण, या रस्त्यावर ‘ओव्हरलोड’ रेतीचे ट्रक मोठ्या प्रमाणात जात असल्याने डांबर मातीत मिसळला. डांबरी रस्त्याची ऐसीतैसी झाली. रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. संपूर्ण डांबरी रस्ता मातीत मिसळून गेलेला आहेत. दोनचाकी गाड्या पांजरा-दाभा रस्त्याने क्वचीतच धावताना दिसतात. बोथली ते पांजरा रस्ता अजूनही डांबरीकरणाची प्रतिक्षा करीत आहे. खडीकरण झालेला रस्ता पूर्णत: उखडला आहे. काही जागची खडी कुढे गेली याचा शोध घ्यावा लागतो. रस्ता रेतीमय झाला. या मार्गाने जाण्यासाठी पर्याय नाही, ज्यांना खड््यातून वाहन चालविण्याची हौस आहे असेच व्यक्ती या मार्गाने ये-जा करतात. नविन व्यक्ती एकदा बोथली ते दाभा या मार्गावरुन वाहनाने प्रवास केला तर दुसऱ्यांदा जाण्यासाठी नक्कीच तयार होणार नाही, अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे.
मोहाडीच्या पश्चिमेस एक रस्ता मोरगाव-महालगाव- कान्हळगाव, दुसरा चौंडेश्वरी ते कान्हळगाव हे तीनही मार्ग-अतिशय खराब झाले आहेत. पावलो पावली डांबरी रस्त्यांना खड्डेच खड्डे पडले आहेत. प्रवाशांसाठी हा मृत्यूमार्ग तयार झाला आहे. पश्चिमेकडील वर्दळीचे २५-३० गावांना जोडणारे हे तीन मार्ग पक्की दुरुस्तीची वाट बघत आहेत. अपघातासाठी सज्ज झालेले रस्त्याचे खड्डे तीन दशकातपासून दुरुस्तीची प्रतिक्षा करीत ओहत. तीस वर्षात या रस्त्याने बघितली नाही. दहेगावपासून रोहणा, रोहणा ते बेटाळा, रोहणा ते इंदूरखा या रस्त्याचेही तेच हाल आहेत. कान्हळगाव-पिंपळगाव रस्ताही डांबरीकरणाची वेळ कधी येते याची वाट बघत आहे.
रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली डांबरीकरण झालेल्या रस्त्यांच्या दोन्ही बाजू पून्हा खोदले जातात. पून्हा तयार केले जातात. रस्त्यांच्या दोन्ही बाजूना मुरुम घालण्यात येतो. त्या रस्त्यावरचा मुरुम महिन्याभरात कुठे जातो याचा शोध घ्यावा लागतो. दरवर्षी राज्य मार्गाच्या दुरुस्तीवर करोडो रुपये खर्ची घालण्यात येतात, पण एक वर्षात पून्हा तिच स्थिती कशी तयार होते. राज्य मार्गावरचे खड्डे पडणे, कडेला मुरुम घालणे ही ठेकेदारांना व अधिका-यांना संपन्न करण्याची पर्वणी ठरते. पण ग्रामीण भागातील डांबरीकरण झालेल्या रस्त्यांना तीस तीस वर्ष डांबरीकरणाची दुरुस्ती करण्यासाठी सुर्योदय होत नाही.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Akhma Damar road Matiimol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.