पिंपळगाव येथे पशु वंधत्व व औषधोपचार शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:38 AM2021-09-18T04:38:36+5:302021-09-18T04:38:36+5:30
शिबीराचे उद्घाटन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. एस. वंजारी होते. ...
शिबीराचे उद्घाटन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. एस. वंजारी होते. प्रमुख अतिथी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरेश कापगते, पवनीचे सहाय्यक गट विकास अधिकारी एस. टी. लांजेवार, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या शिबिरामधे १९३ जनावरांवर ऑषधोपचार करून खनिज मिश्रण, जीवनसत्वे मिश्रण, जंत निर्मूलन, गोचिड निर्मुलन औषध व प्रामुख्याने गायी म्हशींच्या प्रजनना विषयी औषधोपचार करण्यात आले. २५ गायींच्या रक्तातील हिमोग्लोबीनची तपासणी करण्यात आली. संचालन डॉ. डी. बी. चव्हाण, यांनी केले. शिबिरासाठी डॉ. डी. टी. रेहपाडे, डॉ. एल. के. बारापात्रे, डॉ. एन. एम. सोनकुसरे, व्ही. एच. मोटघरे, साखरकर, पिल्लेवान, पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी, खाजगी सेवादाते व ग्रामवासीयांनी सहकार्य केले.