गोसे आधारभूत धान खरेदी केंद्रावर मनमानी कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:54 AM2021-01-08T05:54:21+5:302021-01-08T05:54:21+5:30
चिचाळ : आधारभूत धान खरेदी केंद्र गोसे येथे शेतकऱ्यांना पैशाची मागणी करून धान मोजणी करण्यात येत असल्याचा शेतकरी यांचा ...
चिचाळ : आधारभूत धान खरेदी केंद्र गोसे येथे शेतकऱ्यांना पैशाची मागणी करून धान मोजणी करण्यात येत असल्याचा शेतकरी यांचा आरोप आहे. खरेदी केंद्रावर होणाऱ्या भ्रष्टाचारी कर्मचारी व संस्थाचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार पवनी यांना निवेदन देऊन केली आहे
पालोरा चौरस येथील शेतकऱ्यांकडून गोसे धान्य खरेदी केंद्रावर धान्य मोजणी करताना टोकनप्रमाणे मोजमाप न करता शेतकरी व व्यापाऱ्यांनकडून देवाणघेवाण करून मोजणी होत आहे. सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेंतर्गत केंद्रावर नियोजित केलेले कर्मचारी यांनी शेतकरी आणि व्यापाऱ्याकडून पैसे घेऊन धान मोजणी करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे नंबरप्रमाणे टोकनधारक शेतकरी धान्य मोजणीपासून वंचित राहिले आहेत. या सर्व भ्रष्टाचारात खरेदी-विक्रीचे कर्मचारी, संचालक मंडळ यांचा सहभाग आहे. कर्मचारी संचालक मंडळ आम्हाला असे करायला सांगत असल्याचे केंद्रावरील कर्मचारी सांगत आहेत. आमची सेटिंग आहे, हमारा कोई कुछ बिगाड नही सकता, अशा प्रकारची धमकीसुद्धा शेतकऱ्यांना दिल्या जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पालोरा येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार पवनी, सहकारी शेत. खरेदी विक्री संस्था पवनी व सहायक निबंधक पवनी यांना निवेदन देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नायब तहसीलदार सुशांत चौधरी यांनी शिष्टमंडळाला दोन दिवसात चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देतांना शिष्टमंडळात भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष मोहन सुरकर, अनिल मेंढे, राजेंद्र फुलबांधे, राजेंद्र काळे, सुखदेव कुर्झेकर, देवीदास माथुरकर, बालाराम वैद्य, मोनू वैद्य, रोहित काजरखने, श्रीराम सुपारे, तुळशीदास कुर्झेकर, सिद्धेश्वर बागडे, योगेश कुर्झेकर, धनराज बागडे, दिलीप वैद्य, मनोज भोंगाळे, देवराम बागडे, मोहन बागडे, गजानन नखाते, भास्कर कावळे, सतीश बघेले, विनोद धारणे, राजेश काजरखने, अश्विन ठवरे, खुशाल बागडे आदी शेतकरीबांधव उपस्थित होते.
कोट बॉक्स
दोषींवर फौजदारी कारवाई करा
पवनी तालुक्यातील आठही धान खरेदी केंद्रावर सावळागोंधळ आहे. लग्गा लावून, पैसे देऊन मागील नंबर पुढे घेऊन धान मोजले जातात, यामुळे सामान्य शेतकऱ्यांची कुचंबणा होत आहे. झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे.
-मोहन सुरकर
Attachments area