लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रिमझिम पावसात ‘गणपती बाप्पा माेरयाऽऽ’च्या गजरात गणपती बाप्पाचे घराेघरी आगमन झाले. सकाळपासूनच गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी जिल्ह्यात लगबग दिसत हाेती. भंडारा शहरातील दसरा मैदानावर गणपती बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली हाेती. यंदा जिल्ह्यात २८६ ठिकाणी सार्वजनिक, तर ३१०५ घरगुती गणपतींची स्थापना हाेणार आहे. गणेश चतुर्थीला भक्तांमध्ये उत्साहाला उधाण आले हाेते. मात्र सर्वजण काेराेना नियमांचे पालन करीत असल्याचे चित्र हाेते.जिल्ह्यात शुक्रवारी सर्वत्र गणेशोत्सवाला उधाण आले हाेते. बच्चे कंपनीसह सर्वांचीच गणपती बाप्पाला घरी नेण्याची लगबग सुरू हाेती. त्यातच सकाळपासून रिमझिम पाऊस बरसत हाेता. या रिमझिम पावसात ‘गणपती बाप्पा माेरयाऽऽ’ असा गजर करीत गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. दसरा मैदानावर सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली हाेती. बच्चे कंपनीच्या चेहऱ्यावरील उत्साह अवर्णनीय हाेता. कुणी वाहनातून, तर कुणी थेट डाेक्यावरून गणपती बाप्पाला आपल्या घरी नेत असल्याचे चित्र हाेते. काेराेना संसर्गामुळे प्रशासनाने मिरवणुकीला बंदी घातली हाेती. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही मिरवणूक काढण्यात आली नाही.भंडारा जिल्ह्यात यावर्षी २८६ सार्वजनिक गणेश मंडळे बाप्पांची स्थापना करणार आहेत, तर घरगुती गणेशांची संख्या ३१०५ राहणार आहे. भंडारा शहरात २८ सार्वजनिक, तर ७१० घरगुती गणेशांची स्थापना करण्यात आली.पाेलिसांचा तगडा बंदाेबस्तपाेलिसांनी गणेश उत्सवादरम्यान तगडा बंदाेबस्त लावला असून १६६३ पाेलीस कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आले आहेत. अप्पर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या नेतृत्वात चार उपविभागीय पाेलीस अधीकारी, १७ पाेलीस निरीक्षक, ४८ सहायक पाेलीस निरीक्षक, ९९३ पाेलीस शिपाई आणि सहाशे हाेमगार्ड यांच्यासह एसआरपीचे एक दल तैनात करण्यात आले आहे. काेराेना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर पाेलीस कारवाई करणार आहे. नागरिकांनी सण, उत्सव शांततेत पार पाडावेत, असे आवाहन जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी केले आहे. भंडारा शहरात विसर्जनासाठी कृत्रिम कुंडाची निर्मित करण्यात आली आहे. यासाेबतच जिल्ह्यातही विविध ठिकाणी गणेश विसर्जनासाठी सुविधा नगर परिषद व ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली आहे. नागरिकांनी काेराेना नियमांचे पालन करुन गणेश उत्सव आणि विसर्जन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.
भंडाराचा राजा विराजमान- भंडाराचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपतीची गांधी चाैक परिसरात शुक्रवारी दुपारी ४ वाजता विधिवत पूजा करुन स्थापना करण्यात आली. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या या गणरायाचे अगदी साधेपणात आगमन झाले. त्यानंतर मंडळाचे जाकी राॅवलानी, शैलेंद्र पशिने, मंगेश वंजारी, सुनील घाेडमारे, अमाेल घाटाेळे, गंगाधर राऊत, मनाेज बनकर, रमेश कुंभलकर, प्रदीप वंजारी यांच्या उपस्थितीत स्थापना करण्यात आली. काेराेना नियमांचे पालन करुन गणेशाची स्थापना करण्यात आली. दरवर्षी या मंडळाची विलाेभनीय आणि आकर्षक अशी उंच मूर्ती असते. परंतु यावर्षी काेराेना नियमांचे पालन करीत चार फुटाची मूर्ती स्थापन करण्यात आली. यावेळी भाविक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.