मेंढा -गडपेंढरी रस्त्याचे डांबरीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:31 AM2021-07-26T04:31:44+5:302021-07-26T04:31:44+5:30
लाखनी : तालुका पोहरा गट ग्रामपंचायतीमधील मेंढा- गडपेंढरी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करावे, या मागणीला घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी ...
लाखनी : तालुका पोहरा गट ग्रामपंचायतीमधील मेंढा- गडपेंढरी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करावे, या मागणीला घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना भाजपा अनु. जाती मोर्चा, भंडारा जिल्हा महामंत्री इंजि. मंगेश मेश्राम, पोहराचे सरपंच रामलाल पाटणकर, घनश्याम मते यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. सुमारे १,५०० लोकसंख्येची दोन्ही गावे आहेत. दोन्ही गावांचा मुख्य रहदारीचा एकच मार्ग आहे. रस्त्याला पूर्णपणे खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असते. त्यामुळे पायी चालणेही शक्य नाही. सायकल- मोटारसायकलने अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जीवितहानी किंवा वित्तहानीची दाट शक्यता आहे. गावकऱ्यांना गावाबाहेर जाताना खूप त्रास सहन करावा लागतो. सार्वजनिक बांधकाम विभागाला मेंढा- गडपेंढरी रस्ता दुरुस्तीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे; अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा मंगेश मेश्राम यांनी दिला आहे.