गाेसेचे बॅक वाॅटर शिरले धान शेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 05:00 AM2021-11-10T05:00:00+5:302021-11-10T05:00:16+5:30
गाेसे धरण प्रकल्प विभागाने पाण्याच्या पातळीत वाढ केली आहे. सध्या या प्रकल्पात २४४.५०० मीटर पाणी पातळी आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्रात पाणी शिरले असून अद्यापही संपादित न झालेल्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे धरणाची अधिकत्तम पाणी साठवण पातळी २४५.५०० मीटर आहे. केवळ एक मीटर पातळी गाठायला कमी आहे. असे असतानाच अनेक शेतात पाणी शिरले आहे. अधिकत्तम पातळीपर्यंत साठवणूक झाल्यास अनेक शेतकऱ्यांचे नुकसान हाेण्याची भीती आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गाेसे धरणाच्या पाणी पातळीत वाढ हाेताच अद्यापही संपादित न झालेल्या शेतशिवारात बॅक वाॅटर शिरुन हाताशी आलेले धान या पाण्यात बुडाले आहे. भंडारा आणि पवनी तालुक्यातील सुमारे २०० हेक्टर क्षेत्रात पाणी शिरल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
गाेसे धरण प्रकल्प विभागाने पाण्याच्या पातळीत वाढ केली आहे. सध्या या प्रकल्पात २४४.५०० मीटर पाणी पातळी आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्रात पाणी शिरले असून अद्यापही संपादित न झालेल्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे धरणाची अधिकत्तम पाणी साठवण पातळी २४५.५०० मीटर आहे. केवळ एक मीटर पातळी गाठायला कमी आहे. असे असतानाच अनेक शेतात पाणी शिरले आहे. अधिकत्तम पातळीपर्यंत साठवणूक झाल्यास अनेक शेतकऱ्यांचे नुकसान हाेण्याची भीती आहे.
गाेसे प्रकल्पासाठी संपादित न झालेल्या आणि बुडीत क्षेत्रालगत असलेल्या शेतजमीन संपादित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. गत पावसाळ्यापूर्वी या शेतजमिनीची माेजणी सुरु करण्यात आली हाेती, परंतु पावसाळ्यात शेतात भात पिकाची लागवड झाल्याने माेजणी करता आली नाही. आता गाेसे प्रकल्प विभागाने नवीन तारीख देऊन तत्काळ शेतजमिनीची माेजणी करावी अशी मागणी हाेत आहे.
प्रकल्पाचे बॅक वाॅटर बेला, दवडीपार, काेरंभी, सालेबर्डी या व इतर भंडारा तालुक्यातील गावांसह पवनी तालुक्यातील अनेक गावातील शेतशिवारात शिरले आहे. त्यात मदन माटे, याेकेश कुटे, मदन मिराशे, भगवान राखडे, लावाजी राखडे, रामकृष्ण वाट, विनाेद राखडे, शंकर मते, परमेश्वर मते, धनराज भाेयर, लक्ष्मण कुथे, भाऊराव राखडे आदींचा समावेश आहे. पाणी शेतात शिरल्याने तीन डीपी पाण्याखाली गेले आहेत.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन
- बॅक वाॅटर शिरलेल्या शेताची तत्काळ पाहणी करुन शेतकऱ्यांना माेबदला द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष यशवंत साेनकुसरे, काेरभीचे उपसरपंच मनाेहर नागदेवे, दवडीपारचे रवी वाट, आकाश राखडे, संजय लांजेवार, राकेश तंबुलकर, सुनील राखडे, मनाेज दुबे, कुणाल राखडे, अमित हुमणे, सुमेध वासनिक आदी उपस्थित हाेते. यासाेबतच वीज वितरण कंपनीला निवेदन देऊन तत्काळ वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.