सावधान! कोरोनाने घेतले एकाचदिवशी २४ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:33 AM2021-04-15T04:33:59+5:302021-04-15T04:33:59+5:30
बॉक्स १४७८ पॉझिटिव्ह, ८३५ कोरोनामुक्त भंडारा जिल्ह्यात बुधवारी १४७८ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यात भंडारा ५७४, मोहाडी ...
बॉक्स
१४७८ पॉझिटिव्ह, ८३५ कोरोनामुक्त
भंडारा जिल्ह्यात बुधवारी १४७८ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यात भंडारा ५७४, मोहाडी १०२, तुमसर १५२, पवनी २२२, लाखनी १५७, साकोली १८५ आणि लाखांदूर तालुक्यातील ८६ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ६६ हजार ८९८ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी ३२ हजार ४६० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर २० हजार ४८१ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ११ हजार ५०७ वर पोहोचली आहे.
बॉक्स
मृत्यूदर १.४५ टक्के, तर रिकव्हरी रेट ६३.०९ टक्के
भंडारा जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असताना, रिकव्हरी रेट कमी होत असल्याचे दिसत आहे. ९६ टक्क्यापर्यंत पोहोचलेला रिकव्हरी रेट आता ६३.०९ टक्क्यापर्यंत खाली आला आहे. तर मृत्यूदर १.४५ टक्के पर्यंत आला आहे.
बॉक्स
११ हजार ५०७ ॲक्टिव्ह रुग्ण
भंडारा जिल्ह्यात ११ हजार ५०७ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात भंडारा तालुक्यातील ४४४७, मोहाडी १०७५, तुमसर १५३६, पवनी १५४८, लाखनी १२१८, साकोली ९५४, लाखांदूर ९२७ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत २० हजार ४८१ व्यक्ती बरे झाले असून, त्यात भंडारा तालुक्यातील ८८७८, मोहाडी १६६३, तुमसर २५५६, पवनी २२९२, लाखनी २१७५, साकोली २०६९ आणि लाखांदूर ८२८ व्यक्तींचा समावेश आहे.