लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : चुलबंद खोऱ्यांत खरीप हंगामाची रोवणीचा श्री गणेशा करण्यात आला. अगदी सोळा दिवसांच्या पºह्याची रोवणी आटोपती घेण्यात आली. संकरीत धान्याच्या वाणाची रोवणी पार पडली. पळसगाव येथील अशोक वडीकार यांच्या २.४० हेक्टर जमिनीवर रोवणीचे नियोजन केले. मंडळ अधिकारी गणपती पांडेगावकर व कृषी सहाय्यक लक्ष्मीकांत बुरडे यांच्या मार्गदर्शनात अत्याधुनिक रोवणी यंत्राने २० बाय १५ सेंटीमीटर या अंतराने करण्यात आली.प्लास्टिकचा आधार घेत नर्सरीची लागवड दोन जून रोजी करण्यात आली. संकरित वाण १३० ते १३५ एवढ्या कालावधीचे असून उत्पन्नाकरिता समाधानकारक असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. आजच्या महागाईच्या काळात कमी खर्चात अधिक उत्पादनाकरिता यंत्रधिष्टीत शेती काळाची गरज झालेली आहे.उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी ज्ञानाचे धडे मंडळ कृषी कार्यालय पालांदूर अंतर्गत पुरविले जात आहेत. शेतकरीसुद्धा जुने ज्ञान सोबत घेत नवीन ज्ञानाचा आधार घेऊन वर्तमानात शेती करीत असल्याने भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील चुलबंद खोरा धान उत्पादनात, भाजीपाल्यात, रब्बी उत्पादनात अग्रेसर ठरलेला आहे.लाखनी तालुक्यात सुमारे २३ हजार ५०० हेक्टरवर पावसाळी धानाची रोवणीचे नियोजन केलेले आहे. चुलबंद खोऱ्यात स्वतंत्र सिंचन योजना असल्याने व पाण्याची मुबलकता सुरळीत असल्याने रोवणी करिता शेतकरी धजावला आहे.रोहिणी व मृग नक्षत्र अपेक्षित बसल्याने रोवणी करिता शेतकऱ्यांची मानसिकता वाढलेली आहे. कोरडवाहूच्या रोवणीला अजून तब्बल १५ ते २० दिवस शिल्लक असल्याने सिंचन क्षेत्रातील रोहणीला मजूर मिळणे सहज शक्य आहे. यात रोजीचा खर्चसुद्धा कमी येत असल्याने शेती फायद्याची ठरण्यास मोठी मदत शक्य आहे.मंडळ कृषी कार्यालय पालांदूर अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी विभागाचे अद्यावत ज्ञान मिळत असल्याने नवे काही करण्याची उमेद आमच्यात तयार झाली आहे. या ज्ञानापोटी नवे काही करण्याच्या उत्सुकतेपोटी स्वत: रोववणीचे यंत्र खरेदी करून अपेक्षित वेळेत रोवणीचा हंगाम प्रारंभ झालेला आहे. इतर शेतकऱ्यांना याची प्रेरणा मिळून नक्कीच उत्पन्नामध्ये भरीव वाढ होईल, अशी आशा आहे.-अशोक वडीकार, प्रगतशील शेतकरी, पळसगाव.शेतकºयांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व मार्गदर्शनाचा लाभ घेत कमी खर्चाची अधिक उत्पन्नाची शेती करावी. पारंपारिकतेला नव्या तंत्राची जोड देत सुनियोजित पद्धतीने शेती केल्यास अन्नदात्याला निश्चितच आत्मसन्मान लाभेल यात शंका नाही. यांत्रिक शेती नियोजनबद्ध पद्धतीने केल्यास नक्कीच कमी खर्चाची शेती शक्य आहे.-गणपती पाडेगावकर, मंडळ कृषी अधिकारी, पालांदूर.
पालांदूरच्या चुलबंद खोऱ्यात रोवणीचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 5:00 AM
उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी ज्ञानाचे धडे मंडळ कृषी कार्यालय पालांदूर अंतर्गत पुरविले जात आहेत. शेतकरीसुद्धा जुने ज्ञान सोबत घेत नवीन ज्ञानाचा आधार घेऊन वर्तमानात शेती करीत असल्याने भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील चुलबंद खोरा धान उत्पादनात, भाजीपाल्यात, रब्बी उत्पादनात अग्रेसर ठरलेला आहे.
ठळक मुद्देअत्याधुनिक यंत्राद्वारे रोवणी : एक हेक्टरमध्ये सोळा दिवसांच्या पऱ्ह्यांची झाली लागवड