लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : घरकूलाचे यादीत नावे असताना अद्याप घरकूल मंजूर झाले नाही. गोंडीटोला येथील लाभार्थ्यांना जीर्ण पडक्या घरात वास्तव्य करण्याची वेळ आली आहे. बाराखडीत आयुष्याचे वळण अडले असल्याचा आरोप लाभार्थी करीत आहेत.ग्रामीण भागात घरकूल मंजुरीचा वाढता अनुशेष आहे. केंद्र आणि राज्य शासनाचे अनुदान देयकावर योजनेचे भवितव्य अवलंबून आहे. एकाने अनुदान अडविला तर दुसरा फक्त टोलवेबाजी पर्यंत सीमीत राहत. यात मात्र गरीब घरकूल लाभार्थ्यांची परवड होत आहे. शासनाने आयुष्याचा निवारा बाराखडीत गुंफून ठेवला आहे. अ, ब, क, ड अशा या याद्या आहेत. या यादीत असणारी नावे क्रमवारीनुसार मंजूर केली जात आहे. या यादी नुसार मंजुरी मिळताना घरकुलाचे प्रतिक्षेत अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे. परंतु त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. प्रतिक्षा यादीत क्रमवारीनुसार घरकुलाचे यादीला मंजुरी देताना सर्वेक्षण नुसार आणि गरजू लाभार्थ्यांचा विचार करण्यात येत नाही. यामुळे जीर्ण आणि पडक्या घरात त्यांना वास्तव्य करावे लागत आहे. गोंडीटोला या दीड हजार लोकवस्तीच्या गावात प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना अंतर्गत अनु. जाती व रमाई आवास योजना अंतर्गत अनु. जाती प्रवर्गात असणाऱ्या लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या प्रवर्गात असणारा अनुशेष अंतिम टप्प्यात असला तरी अन्य प्रवर्गातील गरीबांचा अनुशेष वाढता आहे.या गावातील सुनील राऊत, अनिल राऊत, कलाबाई राऊत, कुवरलाल राऊत हे कुटुंब अंत्योदय यादीत जीवन जगत आहेत. गावात मोलमजुरी करणे त्यांचा व्यवसाय आहे. शेती नाही, घरातील परिस्थिती अत् यंत हलाखीची असून घरात अठरा विश्व दारिद्र्य आहे. रोजगार आणि शिक्षणाचा अभाव आहे. राऊत कुटुंबियांनी रितसर ग्रामपंचायतकडे घरकूलाकरिता नावे दिली आहेत. त्यांचे नावांची नोंद करण्यात आली आहे. परंतु क्रमवारीनुसार त्यांचा नंबर आलेला नाही. यामुळे घरकूल मंजूर झाले नाही. त्यांचा अनेक वर्षापासून घरकूल करिता संघर्ष सुरु आहे. परंतु त्यांचे संघर्षाला अपयश आले आहे. अती गरजू असताना त्यांचे नाव मंजुरीला प्रथम प्राथमिकता दिली जात नाही. यामुळे जीर्ण आणि पडक्या घरात त्यांचे वास्तव्य आहे.ग्रामपंचायतने त्यांचे नाव पाठविले आहे. यामुळे शासन अंतर्गत मंजुरी नंतर त्यांना घरकूल मिळणार असले तरी अती गरजू निकषानुसार राऊत कुटुबियांना घरकूल देण्याची गरज आहे. घरकूल अभावी त्यांचे जीव जीर्ण घरात धोक्यात आले आहे.रमाई आवास योजनेचे अनुदान अडलेअनु. जाती नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता रमाई आवास योजना राबविण्यात आली आहे. या घरकूल योजनेचा अनुदान ऐन पावसाळ्यात देण्यात आला नाही. यामुळे घरकुलांना ताडपत्रीचे आच्छादन देऊन वेळ मारून नेली जात आहे. आधीच गरीब असणाºया लाभार्थ्यांचा निधी अभावी धांदल उडत आहे. अर्धवट बांधकाम पूर्ण करण्याकरिता तात्काळ निधी मंजूर करण्याची मागणी चुल्हाडचे सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शामकुवर यांनी केली आहे.राऊत कुटुंब पात्र लाभार्थी असताना त्यांना गती गरजू अंतर्गत घरकूल मंजूर करण्याची आवश्यकता आहे.-संजय राऊत, सदस्य ग्रामपंचायत गोंडीटोलापावसाळा असल्याने घरकुलांचे उर्वरीत अनुदान जलद गतीने दिले पाहिजे. या शिवाय गरजू नावाचा विचार करून त्यांना घरकूल देण्याची गरज आहे.-किशोर राहांगडाले, बिनाखी
गोंडीटोलाचे लाभार्थी घरकुलापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 5:00 AM
ग्रामीण भागात घरकूल मंजुरीचा वाढता अनुशेष आहे. केंद्र आणि राज्य शासनाचे अनुदान देयकावर योजनेचे भवितव्य अवलंबून आहे. एकाने अनुदान अडविला तर दुसरा फक्त टोलवेबाजी पर्यंत सीमीत राहत. यात मात्र गरीब घरकूल लाभार्थ्यांची परवड होत आहे. शासनाने आयुष्याचा निवारा बाराखडीत गुंफून ठेवला आहे. अ, ब, क, ड अशा या याद्या आहेत. या यादीत असणारी नावे क्रमवारीनुसार मंजूर केली जात आहे.
ठळक मुद्देजीर्ण घरात वास्तव्य : आयुष्याच्या वळणावर प्रतीक्षा