Bhandara-Gondia Loksabha Bypoll 2018 Result : राष्ट्रवादीने भाजपाला (आ)पटले; 'किंग मेकर' ठरले नाना पटोले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 07:37 AM2018-05-31T07:37:01+5:302018-05-31T19:42:20+5:30

राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना मतमोजणीच्या १६ व्या फेरीत २ लाख ७० हजार ४७१ मते मिळवून २७,२०६ एवढ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत.

Bhandara Gondia Loksabha Bypoll Result Live Updates | Bhandara-Gondia Loksabha Bypoll 2018 Result : राष्ट्रवादीने भाजपाला (आ)पटले; 'किंग मेकर' ठरले नाना पटोले!

Bhandara-Gondia Loksabha Bypoll 2018 Result : राष्ट्रवादीने भाजपाला (आ)पटले; 'किंग मेकर' ठरले नाना पटोले!

भंडारा/गोंदिया - भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसमधील लढतीमुळे लक्ष लागून राहिलेल्या  भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुकर कुकडे यांनी तब्बल 40 हजार मतांनी भाजपाच्या हेमंत पटलेंचा पराभव केला. नाना पटोले यांनी कुकडेंच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. नाना पटोले आणि भाजपासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. यात अखेर नाना पटोले यांनी बाजी मारली. पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादीचे कुकडे हे आघाडीवर होते. ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम राखत भाजपाच्या पटलेंना पराभवाची धूळ चारली.

तत्पूर्वी मधुकर कुकडे यांच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगामुळे मतमोजणी केंद्रावर काहीसा तणाव निर्माण झाला होता. केंद्रावर तैनात असलेल्या पोलीस अधिक्षकांनी मधुकर कुकडेंना ओळखले नाही. त्यामुळे त्यांनी कुकडे यांच्याकडे ओळखपत्र मागितले. यामुळे कुकडे आक्रमक झाले होते. त्यांनी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. त्यानंतर निवडणूक आयोगाने कुकडेंना माफी मागा, अन्यथा नियुक्तीपत्र देणार नाही, असा इशारा दिला होता. यावरून प्रशासनाला हाताशी धरून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप मधुकर कुकडेंनी केला आहे.

(भंडारा -गोंदियामधील मशीन बंद पाडण्यासाठी राज्यशासन आणि निवडणूक आयोगाचे संगनमत)

ठळक घडामोडी

 



 


भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे.  राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे आघाडीवर आहेत.  

मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 1,62,287    
हेमंत पटले - (भाजपा) - 1,49,935
 
- सहावी फेरी
मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 1,02,000
हेमंत पटले - (भाजपा) - 94,868

- पाचवी फेरी
मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 85,160
हेमंत पटले - (भाजपा) - 80,131

चौथ्या फेरीत राष्ट्रवादी 3959 मतांनी पुढे
 

-तिसरी फेरी
मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 51219
हेमंत पटले - (भाजपा) - 48382

- मतमोजणी माहिती मिळण्यास विलंब. आठवी फेरी सुरू असताना तिसऱ्या फेरीची माहिती जाहीर.

- दुसरी फेरी : मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 35512 मतं, हेमंत पटले - (भाजपा) - 33306 मतं

भारिपा - 778
इतर - 448


- तिसऱ्या फेरीनंतर राष्ट्रवादी आघाडीवर, 
भाजपाचे हेमंत पटले पिछाडीवर 

- तुमसर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे पुढे

- पोस्टल मतमोजणीत भाजपा आघाडीवर 

- मतमोजणीस प्रारंभ, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार



पहिली फेरी              
1) मधुकर कुकडे- 18028 (राष्ट्रवादी काँग्रेस)        
2)हेमंत पटले-   17246  (भारतीय जनता पार्टी)       
3) अक्षय पांडे-  195 (विदर्भ माझा पार्टी)            
4)गोपाल उईके   150  (गोंडवाना गणतंत्र पार्टी)       
5) डॉ.चंद्रमणी कांबळे-  101 (आंबेडकर पार्टी ऑफ इंडिया)
6)जितेंद्र राऊत-   54   (अखिल भारतीय मानवता पार्टी)      
7)धरमराज भलावी-  139 (बहुजन मुक्ती पार्टी)    
8) नंदलाल काडगाये-  120 (बळीराजा पार्टी)  
9)राजेश बोरकर-  119 (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी)      
10)एल.के.मडावी- 778    (भारिप  बहुजन महासंघ)
11)अजबलाल तुलाराम- 333 (अपक्ष)
12) किशोर पंचभाई- 49 (अपक्ष)
13)काशीराम गजबे-   445 (अपक्ष)
14)चनीराम मेश्राम-  68  (अपक्ष)
15) पुरुषोत्तम कावळे- 142(अपक्ष)
16)राकेश टेभरे- 329(अपक्ष)
17)रामविलास मस्करे- 448(अपक्ष)
18) सुहास फुंडे- 356 (अपक्ष)
NOTA-226




 


 

नाना पटोले यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यावर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. दरम्यान, ईव्हीएममधील बिघाडामुळे बुधवारी (30 मे) भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील 49 बुथवर फेरमतदान घेण्यात आले. यावेळेस, गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले, असा ठपका ठेऊन त्यांची ताबडतोब बदली करण्यात यावी, असेही आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने काळे यांची लगेच बदलीही केली. मात्र, काळे यांच्याकडून कर्तव्यात काय कसूर झाली, हे मात्र आयोगानं स्पष्ट केलेले नाही. 

(Palghar Loksabha Bypoll Result Live: पालघर कुणाचं? थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार)

 

Web Title: Bhandara Gondia Loksabha Bypoll Result Live Updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.