लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/ गोंदिया:भंडारा- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना मतमोजणीच्या २२ व्या फेरीत ३ लाख ७६ हजार ५६३ मते मिळाली असून त्यांची ५४ हजार ३६१ एवढ्या मतांनी घोडदौड सुरू आहे. भाजपाचे हेमंत पटले यांना आतापर्यंत ३ लाख २२ हजार २०२ मते मिळाली आहेत.ईव्हीएम मशीन्समधील तांत्रिक बिघाडामुळे ही निवडणूक चर्चेत होती. या दोन्ही जिल्ह्यांतील मिळून ४९ ईव्हीएम मशीन्समध्ये २८ मे रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी बिघाड निर्माण झाला होता. याची दखल घेत, ३० मे रोजी येथे काही निवडक मतदानकेंद्रांवर फेरनिवडणूक घेण्यात आली होती.मधुकर कुकडे यांचा विजय निश्चित असल्याची राष्ट्रवादीच्या वर्तुळात चर्चा असून त्यांनी विजयोत्सवही सुरू केला आहे.
भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांची विजयाकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 6:12 PM
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना मतमोजणीच्या २२ व्या फेरीत ३ लाख ७६ हजार ५६३ मते मिळाली असून त्यांची ५४ हजार ३६१ एवढ्या मतांनी घोडदौड सुरू आहे.
ठळक मुद्देभाजपच्या हेमंत पटले यांना ३ लाख २२ हजार २०२ मते