भंडारा पवनी जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:22 AM2021-07-03T04:22:41+5:302021-07-03T04:22:41+5:30
भंडारा - पवनी राजमार्ग जीवघेणी प्रवास . भंडारा : भंडारा-पवनी रस्ता रुंदीकरणाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू ...
भंडारा - पवनी राजमार्ग जीवघेणी प्रवास .
भंडारा : भंडारा-पवनी रस्ता रुंदीकरणाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. उन्हाळ्याच्या काळात हे काम पूर्णपणे बंद होते. पावसाळा सुरू होताच कामाला सुरुवात करण्यात आली आहे. आंबाडी, गिरोला, जंगलव्याप्त क्षेत्र खापा या गावाच्या मुख्य रस्त्यावरून प्रवास करणे प्रवासासाठी जीवघेणे ठरत आहे. मोठ्या वाहनांमुळे अनेकदा रस्ता बंद होतो. दुचाकी चालकांसाठी प्रवास करणे फारच कठीण झाले आहे. पाऊस येताच हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होत असून गाडी घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या भंडारा- पवनी राजमार्गावरील अनेक कार्यालये लॉकडाऊननंतर सुरू झालेेली आहेत. अनेक कर्मचारी आपल्या स्वतःच्या खासगी वाहनाने प्रवास करीत असतात. या जीवघेणी रस्त्यामुळे जीव मुठीत घेऊन त्यांना प्रवास करावा लागत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.