भाजपा सरकारने गोसीखुर्दचा निधी रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:50 AM2019-03-31T00:50:06+5:302019-03-31T00:51:13+5:30

भंडारा-गोंदिया नव्हे तर पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गोसीखुर्द राष्टÑीय प्रकल्पासाठी भाजपा सरकारने निधी उपलब्ध करुन न दिल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे.

The BJP government stopped Gosikhurd's fund | भाजपा सरकारने गोसीखुर्दचा निधी रोखला

भाजपा सरकारने गोसीखुर्दचा निधी रोखला

Next
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : जुमलेबाजांना जनताच धडा शिकविणार, आसगाव परिसरात प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा-गोंदिया नव्हे तर पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी भाजपा सरकारने निधी उपलब्ध करुन न दिल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे. परिणामी लाखो हेक्टर शेती सिंचनाखाली येण्यापासून वंचित असून शेतकऱ्यांचे समृध्द होण्याचे स्वप्न या सरकारने या प्रकल्पासाठी लागणार निधी रोखून पूर्ण होवू दिले नाही. केवळ विकासाच्या नावावर गप्पा मारणाºया भाजपा सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला असून जतनाच त्यांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन प्रफुल्ल पटेल यांनी केले.
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ भंडारा जिल्ह्यातील आसगाव, भागडी, विरली, मांगली चौरस, कोंढा, कोसरा, चिचाड, पवनी व भुयार येथे शनिवारी (दि.३०) आयोजित प्रचार सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी उमेदवार नाना पंचबुध्दे, जि.प.अध्यक्ष रमेश डोंगरे, प्रेमसागर गणवीर, मनोहर राऊत, नरेश दिवटे, बल्लु चुन्ने व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कोणती विकास कामे केली हे सांगण्याची गरज नसून जनतेलाच ती माहिती आहेत. गोसीखुर्द सिंचन प्रकल्प पूृर्ण करणे हे आपले स्वप्न आहे. ही योजना कार्यान्वीत झाल्यास दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी सिंचनाच्या बाबातीत समृध्द होतील. त्यामुळेच हा प्रकल्प मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न होता.मात्र भाजपा सरकारने या प्रकल्पासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला नसल्याचा आरोप केला.
बावनथडी, धापेवाडा हे प्रकल्प या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण करणे तर दूरच राहिले उलट नागपूर शहरातील घाण पाणी नाग नदीच्या माध्यमातून या प्रकल्पात सोडले जात असल्याने पाण्याचे प्रदूषण होत आहे. या दोन्ही जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी आपण भेल प्रकल्प मंजूर केला मात्र भाजप सरकार सत्तेवर येताच भेल प्रकल्प सुरू करण्याऐवजी तो बंद पाडला.
परिणामी हजारो बेरोजगारांना रोजगार मिळण्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे जनतेनीच काय योग्य आहे ते ठरवून सजग राहू मतदान करावे. नाना पंचबुध्दे म्हणाले, भाजप सरकारने ना शेतकºयांसाठी ना बेरोजगार युवकांसाठी काही केले नाही.
उलट मोठ मोठ्या योजनांची घोषणा व जुमलेबाजी करुन केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले. त्यामुळे अशा विश्वासघाती सरकारला जनतेनीच बाहेरचा रस्ता दाखविण्याची गरज असल्याचे सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा या वेळी मार्गदर्शन केले.

Web Title: The BJP government stopped Gosikhurd's fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.