लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा- गोंदिया लोकसभेची निवडणूक मतदारांवर लादल्या गेली. अहंकारात वागणाऱ्याने स्वत: निवडणूक लढविली नाही. आम्हाला जिरविण्याची संधी हुकली. विधानसभा व नगर परिषद निवडणुकीत अडचणी निर्माण केल्या. भाजपमध्ये एकाचे चालत नाही. उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे. कुकडे हे औटघटकेचे तर पटेल हे नियमित उमेदवार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केले.भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारार्थ तुमसर येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उमेदवार हेमंत पटले, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, आ.चरण वाघमारे, आ.विजय राहांगडाले, आ.कृष्णा खोपडे, आ.संजय पुराम, माजी खा.शिशुपाल पटले, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी आ.केशवराव मानकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, राजेंद्र पटले उपस्थित होते.यावेळी ना.गडकरी म्हणाले, देश विकासाच्या मार्गाने धावत आहे. काँग्रेसने सत्तर वर्षात जी कामे केली नाही ती कामे भाजप सरकारने चार वर्षात केली आहेत. पुन्हा बरीच कामे करावयाची आहेत. महाराष्टÑातील शेतकºयांची स्थिती चांगली नाही. शेतमालाला भाव नाही. रोजगार नाही. कर्जमाफीने प्रश्न सुटणार नाही. शेतीला पूरक व्यवसाय उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.उत्पादन खर्च कमी झाला तर शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार आहे. राज्याचे सिंचन क्षेत्र १८ टक्क्यावरून ४० टक्क्यावर नेणार आहे. राज्याला ५ लाख कोटी रुपये राज्यातील विकास कामांना दिले. ४ लाख कोटींचे रस्ते आणि १ लाख कोटी रूपये सिंचन प्रकल्पाकरिता दिले. २६ जुने सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २० हजार कोटी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी दिले. गोसेखुर्द प्रकल्पासाठी ८ हजार कोटी दिले. दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करावयाचा आहे. बावनथडी प्रकल्पाकरिता निधी दिला. ज्या १५ गावांना सिंचनाचा लाभ मिळत नाही. मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवा येणारा काळ सुवर्णासारखा आहे. २०१९ मध्ये पुन्हा प्रफुल्ल पटेलांनी आपली दावेदारी केली आहे. नाना पटोले हे माझ्याकडे खासदारकीची उमेदवारी प्रफुल्ल पटेलांना हटविण्याकरिता मागितली होती. एका घरात मन लागत नाही. केवळ कोलांटउड्या घेण्यातच धन्यता मानत आहेत. संचालन युवराज जमईवार यांनी तर आभारप्रदर्शन बाळु ठवकर यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष कांचन कोडवानी, आनंद जायस्वाल, नगरसेवक प्रमोद घरडे, सुनिल लांजेवार, डॉ.गोविंद कोडवानी, अनिल जिभकाटे, श्याम धुर्वे, विक्रम लांजेवार, गीता कोंडेवार, निशीकांत इलमे, कैलास पडोळे, ललित शुक्ला, मुन्ना पुंडे, राजेश पटले, भाऊराव तुमसरे, अशोक पटले, योगेश रंगवानी, राहुल डोंगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
पोटनिवडणुकीत अहंकार जिरवायची संधी हुकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:22 PM
भंडारा- गोंदिया लोकसभेची निवडणूक मतदारांवर लादल्या गेली. अहंकारात वागणाऱ्याने स्वत: निवडणूक लढविली नाही. आम्हाला जिरविण्याची संधी हुकली. विधानसभा व नगर परिषद निवडणुकीत अडचणी निर्माण केल्या.
ठळक मुद्देनितीन गडकरी : विकास कामांना प्राधान्य द्या