वर्षभरानंतर काेराेना पाॅझिटिव्ह शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:24 AM2021-07-02T04:24:41+5:302021-07-02T04:24:41+5:30
गुरुवारी ५२६ जणांची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात काेणत्याही तालुक्यात रुग्ण आढळून आला नाही, तर चार रुग्ण बरे हाेऊन ...
गुरुवारी ५२६ जणांची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात काेणत्याही तालुक्यात रुग्ण आढळून आला नाही, तर चार रुग्ण बरे हाेऊन घरी गेले. जिल्ह्याचा रुग्ण बरे हाेण्याचा दर ९८.०४ टक्क्यांवर पाेहाेचला आहे. गत महिनाभरापासून मृत्यूची संख्याही कमी झाली आहे. गत काही दिवसात तर मृत्यूची नाेंद झाली नाही.
काेट
गुरुवारी केलेल्या काेराेना चाचण्यांमध्ये जिल्ह्यात काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य आली. ही दिलासादायक बाब आहे. असे असले तरी धाेका मात्र अजूनही संपला नाही. काेराेनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा हाेत असताना नागरिकांनी अधिक सावध राहाणे आवश्यक आहे. नागरिकांनी काेराेना नियमांचे पालन करावे.
संदीप कदम
जिल्हाधिकारी, भंडारा
बाॅक्स
जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६
रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण वाढत असल्याने काेराेना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत आहे. गुरुवारी जिल्ह्यात ३६ ॲक्टिव्ह रुग्ण हाेते. त्यात भंडारा ६, माेहाडी ३, तुमसर ५, पवनी तीन, लाखनी ६, साकाेली आठ, लाखांदूर पाच रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार ४८२ व्यक्तिंना काेराेनाची लागण झाली हाेती. त्यापैकी ५८ हजार ३१८ व्यक्ती काेराेनामुक्त झाल्या असून, ११२८ व्यक्तिंचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर १.९० टक्के आहे.