जिल्ह्याचा काेराेना रिकव्हरी रेट ९५.५५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:37 AM2021-05-21T04:37:38+5:302021-05-21T04:37:38+5:30
जिल्ह्यात गुरुवारी १,३७८ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ५५, माेहाडी ७, तुमसर १६, पवनी १४, लाखनी ...
जिल्ह्यात गुरुवारी १,३७८ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ५५, माेहाडी ७, तुमसर १६, पवनी १४, लाखनी १६, साकाेली २५ आणि लाखांदूर तालुक्यात ५ असे १३८ रुग्ण आढळून आलेत. भंडारा तालुक्यातील ५० वर्षीय महिला तुमसर तालुक्यातील ६० वर्षीय महिला आणि पवनी तालुक्यातील ६५ वर्षीय महिलेचा काेराेनाने मृत्यू झाला.
जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ७२ हजार ५६७ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात ५७ हजार ७१६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी ५५ हजार १५३ व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली. तर १,०३८ व्यक्तींचा काेराेनाने बळी घेतला.
१,५२५ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत असून १,५२५ ॲक्टिव्ह रुग्णांची नाेंद झाली. त्यात भंडारा ५३४, माेहाडी ८४, तुमसर १५४, पवनी ११४, लाखनी २१९, साकाेली १३६, लाखांदूर १०४ रुग्णांचा समावेश आहे. काेराेना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटत असल्याने दिलासा मिळत आहे.