तीन वर्षांपासून उखडले वर्दळीच्या तुमसर-देव्हाडी रस्त्याचे कारपेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:52 AM2019-07-28T00:52:15+5:302019-07-28T00:52:47+5:30
राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा तुमसर-देव्हाडी रस्त्याचे गत तीन वर्षांपासून कारपेट उखडले आहे. मात्र संबंधीत विभागाचे अद्यापही लक्ष नाही तर तीन किलोमीटर रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे. त्यामुळे खड्डेमुक्त महाराष्ट्राची ग्वाही हवेतच दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा तुमसर-देव्हाडी रस्त्याचे गत तीन वर्षांपासून कारपेट उखडले आहे. मात्र संबंधीत विभागाचे अद्यापही लक्ष नाही तर तीन किलोमीटर रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे. त्यामुळे खड्डेमुक्त महाराष्ट्राची ग्वाही हवेतच दिसत आहे.
तुमसर ते देव्हाडी हा पाच किलोमीटरचा रस्ता तालुक्यात सर्वाधिक वर्दळीचा आहे. राष्ट्रीय महामार्गाला हा रस्ता जोडला जातो. तसेच तुमसर रोड रेल्वे स्थानकावर जाणारा हा एकमेव रस्ता आहे. दरदिवशी सुमारे २५ ते ३० हजार नागरिक या रस्त्यावरून मार्गक्रमन करतात. रहदारीच्या रस्त्यावरील कारपेट गत तीन वर्षांपासून उखडले आहे. दीड किलोमीटर रस्त्याचे कारपेट निघाले आहे. उर्वरित रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे. केवळ एक किलोमीटरचा रस्ता रहदारीयोग्य आहे. नाईलाजास्त या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.
रेल्वे स्थानकाला जोडणारा एकमेव रस्ता असल्याने रात्री या मार्गावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. गोंदिया राष्ट्रीय महामार्गाला हा रस्ता जोडतो. गोबरवाही-तुमसर-देव्हाडी हा रस्ता नव्याने दुपदरीकरणाला मंजुरी मिळाली आहे. प्रत्यक्षात येथे कामाला विलंब होत असून किमान कारपेटची दुरूस्ती करण्याची मागणी काँग्रेसचे नेते डॉ. पंकज कारेमोरे यांनी केली आहे.
खड्डे मुक्त महाराष्ट्राची ग्वाही शासन देत आहे. परंतु भंडारा जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. जिल्हा आणि राज्य मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताची कायम भीती असते. पावसाळापुर्वी या रस्त्यांची डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. परंतु संबंधीत विभाग या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे अपघात घडत आहेत. वाहन चालकांना मनक्याचे आजार जळत आहे. संबंधित विभागाने रस्त्यांची दुरूस्ती केली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.