नवेगाव, नागझिराचे साकोलीत कार्यालय असून उपसंचालक, सहाय्यक संचालक व वन परिक्षेत्र अधिकारी असे बडे अधिकारीही आहेत. उन्हाळ्यात आगीपासून वनाचे रक्षणाकरिता वन क्षेत्रासभोवताल आणि वन क्षेत्रातील रस्त्याच्या बाजूचे गवत व लहान काटेरी झुडपे काढण्याचे काम डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत केले जाते. त्यास फायर लाईनचे काम तसेच आगीवर नियंत्रणासाठी फायर वाचरची १५ फेब्रुवारी ते जूनपर्यंत रोजंदारीवर नेमणूक केली जाते. पण अग्नीरक्षकांना आवश्यक ती सुरक्षा उपकरणे उपलब्ध केली गेली नाही. तसेच फायर लाईनचे कामही केले गेले नसल्याचे सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांचे म्हणणे आहे. शासनाने ठरवून दिलेली कामे प्रामाणिकपणे पूर्ण करणे ही वन परिक्षेत्र अधिकाऱ्याची जिम्मेदारी असताना फायर लाईन व रस्ता दुरुस्ती न करता झाल्याचे दाखवून कोट्यवधीचा घोळ केल्याने अग्नितांडव घडले आहे. त्याचेवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बॉक्स
मृतदेह ग्रामीण रुग्णालयात का नेले
घटनास्थळापासून साकोलीचे अंतर कमी व मोठा दवाखाना असताना आगीत होरपळून मृत्यू पावलेल्या तीन हंगामी मजुरांचे मृतदेह सडक अर्जुनीस वनाधिकाऱ्यांनी का नेले ? हे एक कोडेच आहे.
वनक्षेत्र रामभरोसे
पिटेझरी नागझिरा संरक्षित वनाचे संरक्षणासाठी वन परिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक, वन रक्षक व स्थायी वनमजूर आहेत. पण हे सर्व आस्थापना व चेकपोस्टवरच काम करतात. अरण्यात गस्त घालत नाही. त्यामुळे वन क्षेत्र रामभरोसे असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.