लाेकमत न्यूज नेटवर्कपवनारा : भरधाव दुचाकीवर अचानक धडकलेला चितळ स्कूलबसखाली चिरडून ठार झाल्याची घटना तुमसर - नाकाडाेंगरी राज्य मार्गावर गाेबरवाही जंगलात गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात दुचाकीस्वाराला दुखापत झाली नाही.तुमसर तालुक्यातील पाथरी येथील भक्तराज तुलाराम पंचीपात्रे (३१) हा गुरुवारी सकाळी आपल्या दुचाकीने (एमएच ३६ ई ८२९८) तुमसरकडे जात हाेता. त्यावेळी राज्यमार्गावर गाेबरवाही जंगलात अचानक एक चितळ आले आणि दुचाकीवर धडकले. त्यामुळे दुचाकीसह भक्तराज खाली काेसळला. त्याचवेळी मागून एक स्कूलबस आली. या स्कूलबसने दुचाकीला धडक देत चितळाला चिरडले. बसची धडक एवढी भीषण हाेती की दुचाकी २० फूट बससाेबत फरफटत गेली. सुदैवाने भक्तराज रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला काेसळल्याने त्याला दुखापत झाली नाही.या अपघाताची माहिती हाेताच वनकर्मचारी बी. बी. गेडाम, एल. व्ही. बाेरकर, एल. एस. लाडेकर, बी. टी. नागरीकर, डी. जे. गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान अपघातानंतर स्कुलबस पसार झाली. या अपघाताची माहिती भक्तराजने आपल्या नातेवाईकांना दिली. त्यावरुन त्यांनी घटनास्थळ गाठले. राज्य मार्गालगत जंगल असल्याने अचानक वन्यप्राणी रस्त्यावर येण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे असे अपघात हाेतात. वन्यप्राण्यांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष हाेत आहे.
वन्यप्राण्यांचा मुक्त संचारराज्यमार्गाच्या कडेला असलेल्या जंगलातील वन्यप्राणी माेठ्या प्रमाणात रस्त्यावर येतात. या रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनचालकाची नजरचुक झाली की अपघाताची भीती असते.