अर्बन बँक निवडणूक : गुर्जर पॅनेलला सहा जागाभंडारा : येथील दि भंडारा अर्बन को - आॅपरेटीव्ह बँकेच्या अटीतटीच्या निवडणुकीत सहकार पॅनेलला बहुमत मिळाले आहे. या पॅनेलचे १२ संचालक निवडून आले. गुर्जर पॅनेलचे सहा तर जनहित पॅनेलमधून एक संचालक निवडून आला आहे. मंगळवारी रात्री उशिरा या निवडणुकीचा निकाल जाहिर करण्यात आला.संचालकांच्या एकूण १९ जागेसाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली होती. सर्वसाधारण गटातून गुर्जर पॅनेलचे नाना पंचबुध्दे यांना ४,८४१ मते मिळाली. तसेच पांडुरंग खाटीक (४,५९८), उद्धव डोरले (४,५८८), चिंंतामण मेहर (४,५००) आणि हेमंत महाकांळकर यांना (४,२३३) मते मिळून ते विजयी झाले. याच गटातून सहकार पॅनेलचे हिरालाल बांगडकर, अॅड. जयंत वसंतराव वैरागडे यांना ४,४४५ मते मिळाली. रामदास शहारे ४,२९८ मतांनी विजयी झाले. सर्वसाधारण गटातून तुमसर येथून जनहित पॅनेलचे लिलाधर वाडीभस्मे ९२६ मते मिळवून विजयी झाले. पवनी शाखाक्षेत्रातून गुर्जर पॅनेलचे विलास काटेखाये यांनी २,१२३ मते मिळून ते विजयी झाले. सहकार पॅनेलचे लाखनी शाखेतून दिनेश गिरीपुंजे, देवरी शाखेतून महेशकुमार जैन, गोंदया येथे थावानी गोपीचंद भजनदास आणि नागपूर शाखेतून उदय मोगलेवार यांचा विजय झाला. राखीव गटातून सहकार पॅनेलच्या पाच उमेदवारांचा विजय झाला. त्यात इमाव गटातून डॉ. जगदीश कान्हाजी निंंबार्ते (१३,६७०), अनुसूचित जाती, जमाती गटातून महेंद्र हुसन गडकरी (१४,२४२), विमुक्त जाती गटातून धनंजय दलाल (१३,८६३) विजयी झाले. महिलांसाठी राखीव असलेल्या गटातून ज्योती पुनमचंद बावनकर (१२,१७४) आणि कविता प्रशांत लांजेवार (११,४७८) विजयी झाल्या आहेत. सहकार पॅनेलच्या दणदणीत विजयानंतर आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. बुधवारी दुपारी शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक अजय कडू यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
सहकार पॅनेलला स्पष्ट बहुमत
By admin | Published: July 09, 2015 12:35 AM