यामुळेच अस्थमा रुग्णांना त्रास जाणवत असल्याचे दिसून येत असून अशा रुग्णांची संख्या वाढत आहे.
बॉक्स
बालकांमध्ये अस्थमा
अस्थमाचा त्रास लहान मुलांनाही होऊ शकतो. वारंवार नाक बंद होणे, सर्दी होणे, दम लागणे, वातावरण बदलताच त्रास जाणवणे हे सर्व काही याचे संकेत म्हणता येतील. मात्र लहान मुले हे सर्व काही सांगत नाहीत. अशात पालकांनी वेळीच लक्ष देऊन आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.
बॉक्स
प्रतिकारशक्ती कमी
अस्थमा रुग्णांची प्रतिकारशक्ती काही प्रमाणात कमी असते, यात शंका नाही. शिवाय हा त्रास अनुवंशिकही असू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीला असा त्रास असल्यास अन्य सदस्यांनाही तो होतो. यामुळे प्रतिकारशक्ती व अनुवंशिकता या दोन्ही बाजू याला कारणीभूत ठरतात. अशात आपल्या त्रास होतो अशा वस्तूंपासून दूर रहावे.
बॉक्स
ही घ्या काळजी...
अस्थमाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी सर्वप्रथम मास्कचा वापर करावा. त्यानंतर गर्दीत जाणे टाळावे, थंडीत फिरू नये, थंड पदार्थांचे सेवन टाळावे. एवढेच नव्हे, तर आपल्याला त्रास होतो, अशा वस्तूंपासून दूरच राहावे. तरीही त्रास होत असल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
कोट
बदलत्या वातावरणाचा त्रास कित्येकांना जाणवतो व ही सुरुवात असते. यामुळे अशा त्रासदायक वस्तूंपासून दूर राहावे व काळजी घ्यावी. त्यानंतरही त्रास होत असल्यास अंगावर ओढवून न घेता लगेच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- डॉ. प्रफूल्ल नंदेश्वर, भंडारा.