लसीकरणपूर्व कोविड लसची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:29 AM2021-01-14T04:29:39+5:302021-01-14T04:29:39+5:30

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १६ जानेवारी रोजी देशात सर्वत्र कोविड लस उपलब्ध केली जाणार आहे. त्यानुसार सदर लसचे कोविन ॲपमध्ये ...

Color training of covid vaccine before vaccination | लसीकरणपूर्व कोविड लसची रंगीत तालीम

लसीकरणपूर्व कोविड लसची रंगीत तालीम

Next

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १६ जानेवारी रोजी देशात सर्वत्र कोविड लस उपलब्ध केली जाणार आहे. त्यानुसार सदर लसचे कोविन ॲपमध्ये नोंदणीकृत लाभार्थ्यांना लसीकरण केले जाणार आहे. सदर लसीकरण करण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्ण ओळख पडताळणी, प्रतीक्षा, लसीकरण व रुग्ण निरीक्षण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या कक्षांतर्गत प्रारंभी कोविन ॲपमध्ये नोंदणीकृत रुग्णांची ओळख करण्यासाठी पडताळणी कक्ष ते निरीक्षण कक्षापर्यंत एकूण पाच आरोग्य अधिकारी,कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

दरम्यान, बुधवारी येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लसची लसीकरणपूर्व रंगीत तालीम घेताना काही लाभार्थ्यांचे ड्राय रन घेण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांनी लसीकरण करून घेताना कोविड नियमाचे व शासन निर्देशाचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर लसीकरणानंतर निरीक्षण कक्षात अथवा रुग्ण घरी गेल्यानंतर काही गुंतागुंत जाणवल्यास संबंधित रुग्णाने जवळच्या आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका अथवा आरोग्य अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या. तथापि, येत्या १६ जानेवारी रोजी भंडारा जिल्ह्यातील पवनी, भंडारा, तुमसर व लाखनी या चार तालुक्यात प्रत्यक्ष लसीकरण केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वानखेडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलिनीकांत मेश्राम, डॉ. रजनीकांत मेश्राम, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ललित नाकाडे, डॉ. महेश नाकाडे, डॉ. तुषार लांजेवार, डॉ. मृणाल पडोळे, नाना भेंडारकर, भारत गणवीर, मांढरे, झोडे, आंबिलढुके यासह अन्य आरोग्य कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.

Web Title: Color training of covid vaccine before vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.