मैत्रने दिले पाडसाला जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:00 PM2017-11-13T23:00:31+5:302017-11-13T23:00:50+5:30
उमरेड-पवनी-कºहांडला अभयारण्याला लागूनच गोसेखुर्द धरणाच्या उजवा कालवा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : उमरेड-पवनी-कºहांडला अभयारण्याला लागूनच गोसेखुर्द धरणाच्या उजवा कालवा आहे. या कालव्यात वन्यप्राणी नेहमीच घसरून पडत असल्यामुळे त्यांचे जीवीतास धोका निर्माण झाला आहे. मैत्र वन्यजीव संवर्धन संस्थेच्या तत्परतेमुळे कालव्यात पडलेल्या निलगाईच्या पाडसाला वाचविण्यात मैत्रला यश आले आहे.
सोमवारला सकाळच्या सुमारास शेषनगरनजीकच्या कालव्यात नीलगाईचे पाडस पडल्याची माहिती गस्तीवर असलेले बीटरक्षक ए.एस. करपते व वनमजूर रामचंद्र कुर्झेकर यांच्या निर्दशनास आली. त्यानंतर त्यांनी मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन संस्थेचे सचिव माधव वैद्य यांना माहिती देऊन बोलावले. त्यानंतर मैत्रचे सचिव माधव वैद्य व उपाध्यक्ष महादेव शिवरकर हे चमूसह घटनास्थळावर जावून निलगाईच्या पाडसाला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु जिवाच्या भीतीने ते पाडस सैरावैरा पळू लागले. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाºयांकडे असलेल्या जाळाच्या साहायाने सैरावैरा पळणाºया पाडसाला गोसेखुर्द धरणाच्या उजवा कालवा धानोरी बीट-२ येथे पकडण्यात आले.
सदर पाडस शेषनगर परिसरात पडल्यामुळे नीलगाईचा कळप हा उमरेड-पवनी-कºहांडला अभयारण्यातील असावा असे वन कर्मचाºयांनी सांगितले. त्यानंतर या पाडसाला वनविभागाच्या कर्मचाºया समक्ष अभयारण्यातील पवनी बिटात सोडण्यात आले.
यावेळी मैत्रचे संघरत्न धारगांवे, अमोल वाघधरे, अंगत बानाईत, अमित काटेखाये, चंदे देशमुख, शिवदास वैद्य, रामदास तेलमासरे, खिलेंद्र बावनकर, दयाराम वैद्य यांचेसह वनविभागाचे बिटरक्षक ए.एस. करपते, ए.ए. खेंते, एस.एम. जायभाये, वनमजूर रामचंद्र कुर्झेकर यांनी सहकार्य केले.