आंदोलनस्थळी पवनी तालुका व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेस, सेवादल, कामगार सेल, अल्पसंख्याक सेल, अनुसूचित जाती तसेच सर्व सेल आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रास्ता रोको आंदोलनात विकास राऊत, राजकपूर राऊत, हंसा खोब्रागडे, धनंजय तिरपुडे , शंकरराव तेलमासरे, निलेश सावरबांधे, सुरेश ब्राम्हणकर, मनोहर उरकूडकर, धर्मेंद्र नंदरधने, अशोक पारधी, अनिकेत गभने, मोहित मोहरकर, संजय सार्वे, राजेश तलमले, बंडू ढेंगरे, अमित जिभकाटे, सुलतान अली, गोपाल नंदरधने, राकेश बिसने, चंद्रशेखर कावळे, विजय रायपूरकर, अवनती राऊत, भगवान नवघरे, तुळशीदास बिलवने, रामभाऊ कुर्झेकर, वैद्यराज शिवणकर, श्याम धनविजय, मनोहर मेश्राम, विलास घावळे, मोहन चिचमलकर, गोपाल भिवगडे, हनुमान भिवगडे, नत्थु हटवार, गणेश धनजुडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले होते. परंतु मागण्यांसंदर्भात कार्यवाही न झाल्याने अखेर आंदोलन करावे लागले असे यावेळी सांगण्यात आले.
बॉक्स
पवनी ठाण्यात मागण्यांवर चर्चा
नवनिर्मित राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी खड्डे, भेगा पडलेल्या आहेत म्हणून गुणवत्तेची चौकशी करण्यात यावी. महामार्गाची उंची वाढत असल्यामुळे शेतातील पारंपरिक रस्ते बंद झालेत. त्यांना लवकरात लवकर रस्ते तयार करून देण्यात यावेत. महामार्गाची कामे करण्यासाठी गौण खनिज तलावातील आणि इतर भागाचे नुकसान करून शासनाचा महसूल बुडवल्याची शंका आहे त्याची चौकशी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी पवनी ठाण्याच्या सभागृहात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, तहसीलदार निलिमा रंगारी, पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड, महामार्ग यंत्रणेचे कार्यकारी अभियंता जगताप उपस्थित होते.
090921\img_20210909_141947.jpg
रास्ता रोको आंदोलनाचे प्रमुख जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांना डिटेन करण्यासाठी पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांनी ताब्यात घेतले.