बॉक्स
प्रवाशांना मास्क बंधनकारकच
प्रवाशांना मास्क, सॅनिटायझर बंधनकारकच आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसमधील प्रवाशांना प्रशासनाने मास्क बंधनकारक केले आहे. यामध्ये अनेक प्रवासी मास्क वापरत आहेत. मात्र तरीही काही प्रवासी मात्र विनामास्क प्रवास करत असल्याचेही दिसून येते. तसेच एका सीटवर एकच प्रवासी व प्रशासनाचे नियम पालन बंधनकारक आहे.
बॉक्स
ट्रॅव्हल्सवर आरटीओची कारवाई नाहीच
खासगी ट्रॅव्हल्समधून अनेक प्रवासी प्रवास करतात. मात्र यामध्ये कोरोना नियमांचे पालन होते किंवा नाही याची पाहणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नियमितपणे होत नसल्याची माहिती आहे. ट्रॅव्हल्सवर कारवाई केली जात नसल्याचे चित्र अनेकदा दिसून येत आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कोरोना संसर्गात ट्रॅव्हल्सची तपासणी करण्याची गरज आहे.
बॉक्स
ई पास बंधनकारकच
परजिल्ह्यात प्रवासी वाहतूक करावयाची असल्यास प्रशासनाने ई पास बंधनकारक केला आहे. तरच प्रवाशांना दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी दिली जाते. यासाठी पोलीस प्रशासन पुढाकार घेत असले तरी खासगी ट्रॅव्हल्सच्या वाहतुकीची परवानगी मात्र पोलीस विभागाकडे येत नसल्याची माहिती आहे.