गृहिणींनी भाजीपाला, किराणा, हॉटेलिंग या गोष्टींवरील खर्च बऱ्याच प्रमाणात कमी केला आहे. कटिंग दर वाढल्याने लहान मुलांची कटिंगसुद्धा घरीच करण्यास सुरुवात केली. नवीन कपडे खरेदी, चैनीच्या वस्तूंची खरेदी व अनावश्यक गोष्टींवर होणार खर्च टाळण्याचा प्रयत्न केला आहे.
विजेचा काटकसरीने वापर करून एकप्रकारे गृहिणींनी सर्वच गोष्टींत काटकसर करून अनावश्यक खर्चाला ब्रेक लावला आहे. कोरोनामुळे अनेक कुटुंबांना बचतीचे महत्त्वसुद्धा कळले आहे.
बॉक्स
गृह उद्योग उभारून कुटुंबाला हातभार लावला
कोरोनामुळे कुटुंबातील व्यक्तींचे उत्पन्न कमी झाले. मात्र, काही खर्च हे करावेच लागत असल्याने खर्च कमी केला. शिवाय कुटुंबाला आपलादेखील हातभार लागावा यासाठी मास्क तयार करणे यासह पापड, लोणचे तयार करण्याचा गृह उद्योग सुरू केला, तसेच आवश्यक गोष्टींवरच खर्च करण्याला प्राधान्य दिले.
- यशोधरा वासनिक, गृहिणी.
बॉक्स
अनेक गोष्टींत केली काटकसर
भाजी विक्री हा आमचा कुटुंबातील महत्त्वाचा व्यवसाय आहे. लॉकडाऊनमुळे भाजी विक्री करताना पुरेसा वेळ मिळत नव्हता, तर उत्पन्नदेखील बऱ्याच प्रमाणात कमी झाले. त्यामुळे अनेक गोष्टींवरील खर्चात बचत केली आणि काटकसर करून कमी खर्चात कसे घर चालविता येईल या गोष्टीलाच प्राधान्य दिले.
- विमल कोटांगले, गृहिणी.
बाॅक्स
कोरोनाने काटकसर करण्याची सवय लावली
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने नोकरीवर असलेली मुले घरी परतली. त्यामुळे कमी खर्चात कुटुंब कसे चालवायचे, याची सवय लागली. बचत गटाच्या माध्यमातून कापडी पिशव्या तयार करण्यात आल्या. यामुळे संपूर्ण कुटुंबालाच काटकसर करण्याची सवय लागली. - साखरे, गृहिणी.