यंदा दुर्गा उत्सवावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 05:00 AM2020-10-13T05:00:00+5:302020-10-13T05:00:15+5:30

जिल्ह्यातच नव्हे तर प्रत्येक गावा-गावात दुर्गा उत्सव सजरा केला जातो. यावर्षी १७ ऑक्टोबरपासून होवू घातलेल्या दुर्गा उत्सवात कार्यक्रमाची रेलचेल असते. सार्वजनिक दुर्गा मंडळ १५ दिवसापूर्वीपासून कार्यक्रमाची आखणी करण्यात गुंतली असतात.त्यादृष्टीने त्याची हालचाल सुरु असते.

Corona's savat on Durga festival this year | यंदा दुर्गा उत्सवावर कोरोनाचे सावट

यंदा दुर्गा उत्सवावर कोरोनाचे सावट

Next
ठळक मुद्देउत्सव : मंडळांनी गावागावात राबवावे स्वच्छता अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : दरवर्षी दुर्गा उत्सव आला की परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण होत असते. दुर्गा मंडळाची कार्यक्रम आखण्यासंदर्भात धावपळ दिसून येत होती. सांस्कृतीक कार्यक्रमाबरोबर लहान-लहान बालगोपालांच्या स्पर्धा घेवून नवरात्रोत्सव सजरा करण्याची प्रत्येक गावा-गावात पद्धत आहे. प्रशासनाने दुर्गा उत्सवासंबंधी मंडळांना अद्यापही दिशानिर्देश दिले नाही. तरीही कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभुमीवर लक्ष टाकल्यास निश्चितच दुर्गा उत्सव साधेपणाने साजरा करावा लागणार आहे.
जिल्ह्यातच नव्हे तर प्रत्येक गावा-गावात दुर्गा उत्सव सजरा केला जातो. यावर्षी १७ ऑक्टोबरपासून होवू घातलेल्या दुर्गा उत्सवात कार्यक्रमाची रेलचेल असते. सार्वजनिक दुर्गा मंडळ १५ दिवसापूर्वीपासून कार्यक्रमाची आखणी करण्यात गुंतली असतात.त्यादृष्टीने त्याची हालचाल सुरु असते. सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर बालगोपालाच्या कलागुणांना वाव देणारे विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करुन मनोरंजन करीत असतात. दुर्गा उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक जागृतीचे कार्य सुद्धा होत असतात. परंतु यावर्षी सर्वत्र कोरोना विषाणूचे सावट असल्याने सार्वजनिक मंडळाचा उत्साह कमी दिसून येत आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मोठे कार्यक्रम करण्यास बंदी असल्यामुळे बऱ्याच मंडळातील कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे. सध्या कोरोनाचे सावट असल्याने पूजा अर्चना करणे सुरु राहील. मात्र सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यास बंदी असेल. मंडळानी दुर्गा उत्सवातील संपूर्ण दिवसांमध्ये सामाजिक बांधिलकी स्विकारुन गाव स्वच्छता करण्याचे उपक्रम हाती घ्यावे. दुर्गा उत्सवात विनाकारण होणारा खर्च टाळून कोरोना निधी द्यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

Web Title: Corona's savat on Durga festival this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.