सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची देशाला गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:54 AM2021-01-08T05:54:35+5:302021-01-08T05:54:35+5:30
महावितरण भंडारातर्फे रविवारी सामाजिक न्याय भवन सभागृहात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ...
महावितरण भंडारातर्फे रविवारी सामाजिक न्याय भवन सभागृहात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी संदीप कदम माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव डाॅ. माधुरी सावरकर, समाजकल्याण कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त आशा कवाडे, ॲड. दुर्गा तलमले, संत शिवराम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुंदा गोडबोले, महिला वृद्धाश्रमच्या संचालिका ज्योती वानखेडे, डाॅ.अनमु भोयर उपस्थित होते. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनगौरवावर आधारित इयत्तानिहाय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये उत्कृष्ट निबंध सादर करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला. प्रास्ताविक ‘महावितरण’चे कार्यकारी अभियंता नीलेश गायकवाड, संचालन स्वाती फटे व सरोज भोवते तसेच आभारप्रदर्शन उपकार्यकारी अभियंता जीवनलता वडस्कर यांनी केले. याप्रसंगी शासकीय, निमशासकीय कार्यालयातील महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय क्षेत्रात कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.