लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : आज विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध सोईसुविधा उपलब्ध आहेत. आंतरराष्टÑीय स्तरावर देशाचे मोजमाप करताना त्या देशाच्या सांस्कृतिकतेचा विचार केला जातो. आपल्या देशाचा सांस्कृतिक ठेवा जो आहे, त्याचे जतन झाले पाहिजे. स्पर्धामधून तुमचे नैपुन्य दिसून येते. कला विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व वृद्धीगंत करते. म्हणून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणजे सांस्कृतिक स्पर्धा होत, असे मार्मिक विवेचन गोंडवाना विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ.चंद्रशेखर भुसारी यांनी केले.ने.हि. महाविद्यालयातील गोंडवाना विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग आयोजित इंद्रधनुष्य २०१७ च्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ने. हि. शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैय्या होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थी विकास विभागाच्या संयोजक डॉ. प्रिया गेडाम, आयोजक प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे, उपप्राचार्य डॉ. डी. ए. पारधी, प्रभारी प्रा. पद्माकर वानखेडे, विचारपीठावर उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात, अशोक भैय्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. कोकोडे, संचालन प्रा. बालाजी दमकोंडवार तर आभार डॉ. धनराज खानोरकर यांनी मानले.याप्रसंगी आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धामध्ये नृत्यस्पर्धा व नाट्यस्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातील चमूंनी आपला सहभाग नोंदविला होता. यात शास्त्रीय नृत्यांमध्ये चंद्रपूरची अवनी रापर्टीवार प्रथम ठरली तर लोकनृत्यासाठी सावलीच्या प्राची गेडाम, सावलीचे प्रफुल्ल खिरवडवार, भूकनाट्यासाठी चिमूरचे सचिन भरडे, नकलासाठी चिमूरच्या सुभाष नन्नावरे उत्कृष्ट ठरले. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे होते. यावेळी डॉ. प्रिया गेडाम, उपप्राचार्य डॉ. डी. ए. पारधी आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणजे सांस्कृतिक स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:06 AM
आज विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध सोईसुविधा उपलब्ध आहेत. आंतरराष्टÑीय स्तरावर देशाचे मोजमाप करताना त्या देशाच्या सांस्कृतिकतेचा विचार केला जातो.
ठळक मुद्देइंद्रधनुष्य-२०१७ : चंद्रशेखर भुसारी यांचे प्रतिपादन